लातूर, 2 ऑक्टोबर (हिं.स.)। लातूर तालुक्यातील निवळी येथील श्रीमती कौशल्या हनुमंत माने यांनी सन २०२४-२५ या गळीत हंगामामध्ये हार्वेस्टरद्वारे ऊसतोडणी आणि वाहतूक करून तब्बल विलास सहकारी साखर कारखान्यास ९,३०८ मे. टन ऊसतोडणी आणि वाहतूक करून ऊसतोडणी हार्वेस्टर ठेकेदार म्हणून कारखान्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे.
नवरात्रात आई जंगदबेचा जागर सुरु सअतांना विलास सहकारी साखर कारखान्यात शेती व्यवसायात महिला शक्ती आणि आधुनिक यांत्रिकीकरणाचा प्रभावी समन्वय साधत, निवळी, ता. लातूर येथील कौशल्याबाई हनुमंत माने यांनी मध्ये उल्लेखनीय कामगिरी केली आहे. विलास सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमन श्रीमती वैशालीताई विलासराव देशमुख यांनी बाभळगाव निवासस्थानी कौशल्याबाई माने यांच्या या अभूतपूर्व कामगिरीबद्दल त्यांचे स्वागत करून कौतुक केले. या यशाने विलास साखर कारखान्याच्या माध्यमातून ग्रामीण उद्योगात आर्थिक क्रांती घडवण्याची यांत्रिकीकरणाची क्षमता सिद्ध झाली आहे. विलास सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमन श्रीमती वैशालीताई विलासराव देशमुख यांनी कौशल्याबाई हनुमंत माने यांनी गळीत हंगाम २०२४-२५ मध्ये उल्लेखनीय कामगिरी करुन त्यांनी हार्वेस्टरद्वारे ९,३०८ मे. टन ऊसतोडणी आणि वाहतूक करून प्रथम क्रमांक पटकावला आहे. या कामगिरीबद्दल बाभळगाव निवासस्थानी त्यांचे स्वागत करून कौतुक केले
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis