लातूर, 2 ऑक्टोबर (हिं.स.) राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त काँग्रेसचे आमदार अमित विलासराव देशमुख यांनी गुरुवारी लातूर शहरातील महात्मा गांधी चौक येथे जाऊन राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले.
यावेळी खासदार डॉ. शिवाजी काळगे, लातूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अभय साळुंके, लातूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष किरण जाधव, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव समद पटेल आदिंसह काँग्रेस पक्षाचे विविध पदाधिकारी, कार्यकर्ते नागरिक उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis