बीड, 2 ऑक्टोबर, (हिं.स.)। स्वच्छ भारत अभियान २.० अंतर्गत केंद्रीय गृहनिर्माण तथा शहरी कार्य मंत्रालय (MoHUA), भारत सरकार यांनी स्वच्छता पंधरवड्यादरम्यान स्वच्छता ही सेवा अभियानांतर्गत विविध कार्यक्रम आयोजित करण्याचे निर्देश दिले आहेत. त्याअनुषंगाने मा. प्रशासक तथा मुख्याधिकारी श्री. पोपट निगळ सर यांच्या आदेशान्वये शहरातील विविध भागात स्वच्छता मोहीम राबविण्यात येत आहे.सदरील मोहीम अंतर्गत आज दिनांक 2 ऑक्टोबर 2025 रोजी महात्मा गांधी जयंती निमित्त बाजार रोड येथे स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.
---------------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis