सिडनी वन-डेत भारतीय संघात दोन बदल, कुलदीप यादवचे पुनरागमन
कॅनबेरा, 25 ऑक्टोबर (हिं.स.)भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील शेवटचा सामना सिडनी क्रिकेट ग्राउंडवर खेळला जात आहे. भारतीय संघाने आधीच मालिका गमावली आहे आणि आता क्लीन स्वीप टाळण्याचा प्रयत्न करेल. या सामन्यासाठी भारत
शुभमन गिल आणि मिचेल मार्श


कॅनबेरा, 25 ऑक्टोबर (हिं.स.)भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील शेवटचा सामना सिडनी क्रिकेट ग्राउंडवर खेळला जात आहे. भारतीय संघाने आधीच मालिका गमावली आहे आणि आता क्लीन स्वीप टाळण्याचा प्रयत्न करेल. या सामन्यासाठी भारतीय संघाने त्यांच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये दोन बदल केले आहेत. ज्यामध्ये मनगटाचा फिरकी गोलंदाज कुलदीप यादवचा समावेश आहे. कुलदीप व्यतिरिक्त, वेगवान गोलंदाज प्रसिद्ध कृष्णा देखील प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी देण्यात आली आहे.

ऑस्ट्रेलियाचा कर्णधार मिचेल मार्शने भारताविरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारतीय संघ सलग १८ व्यांदा एकदिवसीय सामन्यात टॉस जिंकू शकला नाही. भारताने शेवटचा २०२३ च्या एकदिवसीय विश्वचषक २०२३ च्या उपांत्य फेरीत न्यूझीलंडविरुद्ध या फॉरमॅटमध्ये टॉस जिंकला होता. आणि त्यानंतर संघाने टॉस जिंकलेला नाही. या मालिकेतील तिन्ही सामन्यांमध्ये ऑस्ट्रेलियाने टॉस जिंकला आहे.

ऑस्ट्रेलियाने प्लेइंग इलेव्हनमध्ये एक बदल केला. ज्यामध्ये झेवियर बार्टलेटच्या जागी नॅथन एलिसचे पुनरागमन झाले आहे. अ‍ॅडलेडमधील दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात बार्टलेटने शानदार गोलंदाजी केली. त्याने भारताला सुरुवातीलाच दोन धक्के दिले होते. पण त्याला या सामन्यासाठी विश्रांती देण्यात आली आहे.

भारताने पहिल्या दोन सामन्यांमध्ये तीन अष्टपैलू आणि तीन वेगवान गोलंदाजांना मैदानात उतरवले. ही रणनीती पहिल्या दोन सामन्यांमध्ये भारतासाठी कामी आली नाही. पण आता भारताने या सामन्यासाठी प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल केले आहेत. कुलदीप आणि प्रसिद्ध यांना नितीश रेड्डी आणि अर्शदीप सिंग यांच्या जागी खेळण्याची संधी देण्यात आली आहे. अ‍ॅडलेडमधील दुसऱ्या सामन्यादरम्यान नितीशला दुखापत झाली होती. ज्यामुळे तो या सामन्यासाठी उपलब्ध नव्हता. नितीशने पर्थमधील पहिल्या एकदिवसीय सामन्यात या फॉरमॅटमध्ये पदार्पण केले होतेय पण दोन्ही सामन्यात तो अपेक्षित कामगिरी करू शकला नाही. पण हर्षितने त्याचे स्थान कायम राखण्यात यश मिळवले आहे आणि प्रसिद्धला संधी देण्यासाठी भारताने अर्शदीपला वगळले आहे.

या सामन्यासाठी दोन्ही संघांची प्लेइंग ११ अशा प्रकारे आहे......

भारत: रोहित शर्मा, शुभमन गिल (कर्णधार), विराट कोहली, श्रेयस अय्यर, अक्षर पटेल, केएल राहुल (यष्टीरक्षक), वॉशिंग्टन सुंदर, हर्षित राणा, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा.

ऑस्ट्रेलिया: मिचेल मार्श (कर्णधार), ट्रॅव्हिस हेड, मॅथ्यू शॉर्ट, मॅट रेनशॉ, अ‍ॅलेक्स केरी (यष्टीरक्षक), कूपर कॉनोली, मिचेल ओवेन, नाथन एलिस, मिचेल स्टार्क, अ‍ॅडम झांपा, जोश हेझलवुड.

--------------

हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे


 rajesh pande