नाशिक, 3 ऑक्टोबर (हिं.स.)।
- पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाढदिवसानिमित्त राबविण्यात येणाऱ्या सेवा पंधरवडा या उपक्रमांतर्गत भाजपा ‘बुद्धिजीवी प्रकोष्ट’ तर्फे आयोजित व्याख्यानात प्रसिद्ध लेखक,अभिनेता व अभ्यासक दीपक करंजीकर यांनी या विषयावर आपले अभ्यासपूर्ण विचार मांडले.पंतप्रधान मोदींच्या काळात देशाच्या अर्थव्यवस्थेत झालेले परिवर्तन,डिजिटल इंडिया अंतर्गत आलेल्या डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर स्कीम तसेच यू पी आय मुळे झालेली क्रांती,वंदे भारत रेल्वे आणि औद्योगिक क्षेत्रातील प्रगती तसेच देशभर होत असलेला पायाभूत सुविधांचा विकास ह्या आधारावर भारत २०४७ पर्यंत विकसीत अर्थव्यवस्था होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
Nothing is impossible, everything is possible.” हे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी प्रत्यक्ष कृतीमधून दाखविले.आजचे संकट हे आजीवन संधीमध्ये रूपांतरित करता येते हा आत्मविश्वास त्यांनी व्यक्त केला व अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या ट्रम्प टॅरिफमुळे आत्मनिर्भर भारताचा हा निर्धार अधिक दृढ झाला ह्याबद्दल त्यांचे देखील आभार मानले.
‘स्वदेशी के अनेक पेहलूओका प्रयोग ही हमारे अर्थतंत्र के सर्वांगीण विकास की नीव होनी चाहिये’ या पंडित दिनदयाल उपाध्याय यांच्या विचारांवर देशाची वाटचाल सुरू आहे.आत्मनिर्भर भारताच्या स्वप्नाची सुरुवात कोरोना महामारीच्या काळात झाली ल,देशाने स्वदेशी लस निर्मिती केली व देशातील नागरिकांनाच नाहीतर जगभर लसीकरण मोहिमेत मोलाचे योगदान दिले.भारताच्या शेजारी असलेल्या बांगलादेश,श्रीलंका,नेपाळ या देशात वाढत असलेली अराजकता आणि त्याचकाळात भारताची अर्थव्यवस्था जगात चौथ्या क्रमांकावर पोहचली आहे.आणि लवकरच तिसऱ्या क्रमांकावर जाणार आहे.देशात ६ कोटी ८९ लाख लघू आणी सूक्ष्म उद्योगांचे जाळे तयार झाले असून प्रत्येक हाताला काम व प्रत्येक कामाला हात आहे.मागील १० वर्षांच्या काळात भारताने २२ कोटी लोकांना दारिद्र्य रेषेच्या बाहेर काढले आहे.Direct benefit transfer scheme मुळे सरकारी योजनेतील गळती थांबली आहे व तोच पैसा आज देशाच्या पायाभूत सुविधा विकास कामासाठी वापरला जातो आहे असे प्रतिपादन कारंजीकर यांनी केले.
तसेच आपला देश आत्मनिर्भरतेतून विकसीत भारत अशी जी वाटचाल करतो आहे ते आपण सर्व सामान्यांपर्यंत पोहचवणे आपले कर्तव्य आहे असे आवाहन त्यांनी उपस्थितांना केले.
सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक व वक्त्याची ओळख बुद्धीजीवी प्रकोष्ठचे संयोजक ॲड.डॉ.श्रीधर व्यवहारे यांनी करून दिली. याप्रसंगी भाजप नाशिक महानगर जिल्हा अध्यक्ष सुनील केदार,ज्येष्ठ नेते लक्ष्मण सावजी यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV