कोल्हापूर - स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी भाजपचा विजय संकल्प मेळावा
कोल्हापूर, 4 ऑक्टोबर, (हिं.स.)। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती म्हणून लढवणार असलो तरी या निवडणुकांमध्ये भाजपच्या कोणत्याही कार्यकर्त्यांच्या वर अन्याय होऊ देणार नाही .असे प्रतिपादन उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी
भाजपचा विजय संकल्प मेळावा


कोल्हापूर, 4 ऑक्टोबर, (हिं.स.)। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती म्हणून लढवणार असलो तरी या निवडणुकांमध्ये भाजपच्या कोणत्याही कार्यकर्त्यांच्या वर अन्याय होऊ देणार नाही .असे प्रतिपादन उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले. कुर तालुका भुदरगड येथे भारतीय जनता पार्टी कोल्हापूरचा विजय संकल्प मेळावा आयोजित करण्यात आला होता या मेळाव्यात ते बोलत होते.

यावेळी बोलताना नामदार चंद्रकांत दादा पाटील पुढे म्हणाले लोकसभा निवडणूक विधानसभा निवडणूक ही आपण महायुती म्हणून लढवलेली आहे कोल्हापूर जिल्ह्यात विरोधी पक्षाचा एकही आमदार नाही सर्वच्या सर्व महायुतीचे उमेदवार निवडून आलेले आहेत ज्या कार्यकर्त्यांनी या महायुतीच्या आमदारांना निवडून आणण्यासाठी आटोकाट प्रयत्न केले त्यांची निवडणूक आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या रूपाने होऊ घातलेले आहे त्यांच्यासाठी आमच्यासारख्या लोकप्रतिनिधींनी काम करणे म्हणजे त्यांच्या प्रति आदर व्यक्त करण्यासारखेच आहे त्यामुळे भविष्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आपण कार्यकर्त्यांच्या साठी काम करू .

दिवाळीनंतर दोन दिवसात आचारसंहिता जाहीर होईल, त्यामुळे आपण निवडणुकीच्या तयारीला लागूया,

महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये मोठा फरक असला पाहिजे. त्यासाठी येणाऱ्या दिवाळीचा उपयोग करून घ्या. लोकांना भेटून संपर्क वाढवा. निवडणूक म्हणून लढवायची आहे मात्र शेवटच्या क्षणी कोणता घ्यायचा हे वरिष्ठ नेते ठरवतील, असे ते म्हणाले. आमच्या कोणत्याही कार्यकर्त्यावर अन्याय होऊ देणार नाही, असे ते म्हणाले. राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना मागत असलेल्या ठिकाणी आपला चांगला उमेदवार असेल तर मैत्रीत लढू, पण कार्यकर्त्यांचा बळी दिला जाईल असं लढणार नाही, असेही त्यांनी सांगितले.

आगामी निवडणुका महायुती म्हणूनच लढवण्याचा आमचा मानस असला तरी यामध्ये भारतीय जनता पार्टीच्या कोणत्याही कार्यकर्त्यांच्या वर अन्याय होणार नाही याची दक्षता घेतली जाईल .

यावेळी भाजपच्या कोल्हापूर जिल्हा पश्चिम विभागाच्या नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांना नियुक्ती पत्राचे वाटप करण्यात आले. प्रारंभी भाजपाचे जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटील यांनी प्रास्ताविकात विजय संकल्प मेळाव्याचा उद्देश स्पष्ट केला. आगामी 13 तारखेला जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकांचे बिगुल वाजणार आहे .याच तारखेला या निवडणुकीचे आरक्षण जाहीर होणार आहेत .आरक्षण जाहीर झाल्यानंतर प्रत्येक तालुक्यात त्या त्या लोकांना पक्षाचं आणि उमेदवाराचं काम करणं सोयीचं व्हावं आणि भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी या निवडणुकीसाठी तयारी करावी हा संदेश देण्यासाठीच हा विजय संकल्प मेळावा आयोजित केला असल्याचा पुनरुचार नाथाजी पाटील यांनी केला .

---------------

हिंदुस्थान समाचार / VijayKumar Pandurang Powar


 rajesh pande