बीड, 4 ऑक्टोबर (हिं.स.)। आमदार नमिता मुंदडा यांच्या उपस्थितीत अंबाजोगाई तालुक्यातील अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेण्यासाठी तहसील कार्यालयात सर्व विभाग प्रमुखांची नैसर्गिक आपत्ती बैठक पार पडली. या बैठकीत घरांची पडझड, पूरामुळे बाधित रस्ते, पूल, बंधारे व दगावलेली जनावरे यांचा तपशीलवार आढावा घेतला गेला.
सर्व विभागांनी नुकसानीचे पंचनामे तयार करून अहवाल तात्काळ सादर करण्याचे निर्देश दिले. तसेच, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात मदत धनादेश देण्यात आले.
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis