छत्रपती संभाजीनगर, 5 ऑक्टोबर (हिं.स.)।
खेळ हा शिस्त, संघभावना आणि निरोगी आयुष्याचा आधार आहे. या क्रीडा महोत्सवातून अनेक उत्तम खेळाडू घडून समाजाच्या विविध क्षेत्रात गौरव मिळवोत, अशी भावना काँग्रेसचे खा. डॉ कल्याण काळे यांनी व्यक्त केली आहे.
महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या क्रीडा महोत्सवात ते बोलत होते.याप्रसंगी अनेकांची उपस्थिती होती
महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक आयोजित व गुरु मिश्री होमिओपॅथीक मेडीकल कॉलेज व हॉस्पिटल, शेलगांव (ता. बदनापूर, जि. जालना) यांच्या विद्यमाने क्रीडा महोत्सव – 2025 आयोजित करण्यात आला.
या क्रीडा महोत्सवासाठी काँग्रेसचे खासदार डॉक्टर कल्याण काळे यांनी उपस्थित राहून खेळाडूंना शुभेच्छा दिल्या.
या वेळी काँग्रेस जिल्हाध्यक्ष राजाभाऊ देशमूख शिवसेना जिल्हप्रमुख भास्करराव आंबेकर,राजेंद्र राख,बाळासाहेब परदेशी व मान्यवर उपस्थित होते.
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis