बनसारोळा येथील शिक्षण संस्थेच्या दलित मित्र नारायण दादा काळदाते विद्यार्थी वसतिगृह' असे नामकरण
छत्रपती संभाजीनगर, 5 ऑक्टोबर (हिं.स.)। श्री बनेश्वर शिक्षण संस्था, बनसारोळा येथील शेड्युल्ड कास्ट वसतिगृहाच्या नावात बदल करून ''दलित मित्र श्री नारायण दादा काळदाते विद्यार्थी वसतिगृह'' असे नामकरण करण्यात आले. बनसारोळा येथे या कार्यक्रमाचे आयोजन
अ


छत्रपती संभाजीनगर, 5 ऑक्टोबर (हिं.स.)।

श्री बनेश्वर शिक्षण संस्था, बनसारोळा येथील शेड्युल्ड कास्ट वसतिगृहाच्या नावात बदल करून 'दलित मित्र श्री नारायण दादा काळदाते विद्यार्थी वसतिगृह' असे नामकरण करण्यात आले.

बनसारोळा येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. दलित मित्र नारायण दादा काळदाते विद्यार्थी वसतिगृह असे नामकरण करण्याची मागणी गेल्या अनेक वर्षापासून होती ती आज पूर्ण झाली आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विजय फुलारी यांच्या शुभहस्ते नामफलकाचे अनावरण करण्यात आले.

यावेळी आ. विक्रम काळे, आ. सतीश चव्हाण, माजी कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे, माजी कुलगुरू कल्याणकर , माजी कुलगुरू मधुकरराव गायकवाड , मा. आ. वैजनाथ दादा शिंदे, प्र-कुलगुरू डॉ. वाल्मिक सरवदे , श्री. ज्ञानेश्वरराव काळदाते, संस्थेचे उपाध्यक्ष अनिलपंत कुलकर्णी, आदी उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande