नवी दिल्ली, ५ ऑक्टोबर (हिं.स.). दार्जिलिंग पूल दुर्घटनेत झालेल्या जीवित आणि वित्तहानीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे. पंतप्रधान मोदी म्हणाले, दार्जिलिंग पूल दुर्घटनेत झालेल्या जीवितहानीबद्दल मला खूप दुःख झाले आहे. ज्यांनी आपले प्रियजन गमावले आहेत त्यांच्याप्रती मी संवेदना व्यक्त करतो. जखमींना लवकर बरे व्हावे अशी मी प्रार्थना करतो.
पंतप्रधानांनी सांगितले की, मुसळधार पाऊस आणि भूस्खलनाच्या पार्श्वभूमीवर दार्जिलिंग आणि आसपासच्या भागातील परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे. त्यांनी बाधितांना सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले आहे.
सततच्या मुसळधार पावसामुळे उत्तर बंगालमध्ये सामान्य जीवन विस्कळीत झाले आहे. दार्जिलिंग जिल्ह्यात भूस्खलन आणि पूल कोसळून अनेक नागरिकांचा मृत्यू झाल्याची नोंद आहे, तर दोघे बेपत्ता आहेत. या प्रदेशातील मिरिक आणि सुखिया भागात भूस्खलनामुळे अनेकांचा मृत्यू झाला आहे. अपघातानंतर दार्जिलिंग जिल्हा पोलीस आणि आपत्ती व्यवस्थापन पथक मदत आणि बचाव कार्यात गुंतले आहे, तर कालिम्पोंगमधील परिस्थिती अजूनही गंभीर आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे