पुण्यातील रस्ते सुधारण्यासाठी महापालिका-महावितरणची संयुक्त समिती
पुणे, 5 ऑक्टोबर (हिं.स.)। शहरातील प्रमुख रस्त्यावरील अडथळे दूर करण्यासाठी महापालिका आणि महावितरणची समिती स्थापन केली जाणार आहे. या माध्यमातून विजेचे खांब, डीपी यासह अन्य अडथळ्यांचे सर्वेक्षण केले जाणार आहे.शहरातील ३२ रस्ते आणि २० चौकांमधील वाहतूक सु
पुण्यातील रस्ते सुधारण्यासाठी महापालिका-महावितरणची संयुक्त समिती


पुणे, 5 ऑक्टोबर (हिं.स.)।

शहरातील प्रमुख रस्त्यावरील अडथळे दूर करण्यासाठी महापालिका आणि महावितरणची समिती स्थापन केली जाणार आहे. या माध्यमातून विजेचे खांब, डीपी यासह अन्य अडथळ्यांचे सर्वेक्षण केले जाणार आहे.शहरातील ३२ रस्ते आणि २० चौकांमधील वाहतूक सुधारणा करण्यासाठी महापालिका, वाहतूक पोलिस, महावितरण यासह अन्य शासकीय विभाग संयुक्तपणे काम करणार आहेत.त्यानंतर आता महापालिकेने महावितरणच्या अधिकाऱ्यांसोबत चर्चा केली आहे. त्यात अडथळा ठरणारे खांब, फिडर पिलर हटविण्यासाठी संयुक्त समिती स्थापन केली जाणार आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande