छत्रपती संभाजीनगर, 5 ऑक्टोबर (हिं.स.)।
राष्ट्र सेविका समिती छत्रपती संभाजीनगरतर्फे सघोष पथसंचलन आज उत्साहात पार पडले. अत्यंत जल्लोषात आणि शांततेत सघोष पथसंचलन संपन्न झाले. राष्ट्रभक्तीचा संदेश देणाऱ्या या कार्यक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
छत्रपती संभाजीनगर येथील
खडकेश्वर महादेव मंदिरातून या पथक संचलनाला प्रारंभ झाला. या पथसंचलनाने स्वातंत्र्यसेनानी कॉलनी, निराला बाजार, पैठण गेट, टिळक पथ, महात्मा ज्योतिबा फुले चौक या मार्गाने भव्य संचलन केले. संघटित शक्ती, संस्कार आणि राष्ट्रभक्तीचा संदेश देणाऱ्या या कार्यक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
यावेळी प्रमुख वक्त्या मा.डॉ.सौ.प्रतिभाताई फाटक आणि प्रमुख अतिथी मा.सौ.शिल्पाताई पाठक यांची उपस्थिती होती. भारतीय जनता पक्षाच्या फुलंब्री विधानसभा मतदारसंघाच्या आमदार अनुराधा चव्हाण यांची याप्रसंगी उपस्थिती होती
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis