शुभांशु शुक्ला यांची ‘विकसित भारत बिल्डाथॉन’ या उपक्रमासाठी ब्रँड अ‍ॅम्बेसिडर म्हणून नियुक्ती
नवी दिल्ली , 5 ऑक्टोबर (हिं.स.)।आंतरराष्ट्रीय अंतरिक्ष स्थानक (आयएसएस ) पर्यंत पोहोचणारे भारतीय ग्रुप कॅप्टन शुभांशु शुक्ला यांना केंद्र सरकारच्या ‘विकसित भारत बिल्डाथॉन’ या उपक्रमासाठी ब्रँड अॅम्बेसिडर म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. हा कार्यक्रम दे
शुभांशु शुक्ला


नवी दिल्ली , 5 ऑक्टोबर (हिं.स.)।आंतरराष्ट्रीय अंतरिक्ष स्थानक (आयएसएस ) पर्यंत पोहोचणारे भारतीय ग्रुप कॅप्टन शुभांशु शुक्ला यांना केंद्र सरकारच्या ‘विकसित भारत बिल्डाथॉन’ या उपक्रमासाठी ब्रँड अॅम्बेसिडर म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. हा कार्यक्रम देशभरातील शाळांमध्ये नवोपक्रम आणि वैज्ञानिक विचारसरणीला चालना देण्यासाठी सुरू करण्यात आला आहे.

‘विकसित भारत बिल्डाथॉन’ हा शिक्षण मंत्रालय आणि अटल इनोव्हेशन मिशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केला जात आहे. हा देशातील आतापर्यंतचा सर्वात मोठा शालेय हॅकाथॉन आहे, ज्यामध्ये इयत्ता 6 वी ते 12 वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना सहभागी करण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत 1.5 लाख शाळांमधील 1 कोटीहून अधिक विद्यार्थी एकत्र येऊन नवीन कल्पना, डिझाईन्स आणि प्रोटोटाइप्स तयार करतील.

यात विद्यार्थ्यांना चार राष्ट्रीय महत्वाच्या विषयांवर प्रोजेक्ट तयार करावे लागणार आहे, ज्यामध्ये आत्मनिर्भर भारत – स्वावलंबी तंत्रज्ञान आणि उपाययोजना विकसित करणे. स्वदेशी – देशी कल्पना आणि नवोन्मेषांना प्रोत्साहन देणे. वोकल फॉर लोकल – स्थानिक उत्पादने, कला आणि संसाधनांना चालना देणे. समृद्धी – शाश्वत विकास आणि समृद्धीकडे वाटचाल या चार विषयांचा समावेश असणार आहे.

हा बिल्डाथॉन 23 सप्टेंबर रोजी लाँच करण्यात आला होता.

नोंदणी करण्याची अंतिम तारीख 6 ऑक्टोबर असणार आहे. ‘लाइव्ह बिल्डाथॉन’ 13 ऑक्टोबर रोजी आयोजित केला जाईल. तर विजेत्यांची घोषणा डिसेंबर महिन्यात केली जाईल. या काळात विद्यार्थ्यांचे संघ मिळून त्यांच्या कल्पनांना प्रत्यक्ष रूप देतील आणि वास्तविक जीवनातील समस्यांवर उपाय सादर करतील.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande