दिवाळीनंतर दोनच दिवसांत आचारसंहिता लागू होणार ?
पुणे, 5 ऑक्टोबर (हिं.स.)।उच्च आणि तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत मोठा दावा केला आहे. ते म्हणाले, लोकसभा आणि विधानसभेपेक्षा ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद आणि महानगरपालिका निवडणुका या खऱ्या
दिवाळीनंतर दोनच दिवसांत आचारसंहिता लागू होणार ?


पुणे, 5 ऑक्टोबर (हिं.स.)।उच्च आणि तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत मोठा दावा केला आहे. ते म्हणाले, लोकसभा आणि विधानसभेपेक्षा ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद आणि महानगरपालिका निवडणुका या खऱ्या अर्थाने नेत्याची कसोटी पाहणाऱ्या असतात. लोकशाहीतील या निवडणुका सर्वात महत्त्वाच्या आहेत.

भाजपच्या विजयी संकल्प मेळाव्यात बोलताना त्यांनी निवडणूक आयोगाचा संभाव्य प्लॅन उलगडला. ते म्हणाले, कदाचित आज संध्याकाळपर्यंत जिल्हा परिषद निवडणुकीची घोषणा होऊ शकते. माझ्या 40 वर्षांच्या अनुभवावरून सांगतो, दिवाळीनंतर दोनच दिवसांत आचारसंहिता लागू होईल. त्यामुळे आता निवडणुकीच्या तयारीला लागा.

चंद्रकांत पाटील यांनी कार्यकर्त्यांना उद्देशून सांगितले की, निवडणूक ही फास्ट ट्रेनसारखी आहे, प्लॅटफॉर्मवर जो उभा राहील, तो मागे राहील. पण नाराज होऊ नका, राजकारणात प्रयत्न आणि नशीब दोन्ही महत्त्वाचे असतात. 2019 मध्ये ज्यांचे तिकीट नाकारले गेले, त्यापैकी बावनकुळे यांना 2024 च्या विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवार ठरवण्याची जबाबदारी मिळाली, याचा दाखला देत त्यांनी कार्यकर्त्यांना प्रोत्साहन दिले.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande