पुणे, 5 ऑक्टोबर (हिं.स.)
जिल्हा परिषद या वर्षी शिक्षण आणि आरोग्य या दोन सर्वसामान्यांच्या जिव्हाळ्याचे विषयाला प्राधान्य देण्याचे ठरवले आहे. शिक्षणामध्ये मॉडेल स्कूल उपक्रमाची अंमलबजावणी सुरू आहे. परकीय भाषेसाठी निवडक शिक्षकांसाठी प्रशिक्षण सुरू केले आहे. नासा, इस्रोला विद्यार्थी पाठविण्यासाठी निवड प्रक्रिया राबवली. एका बाजूला प्रशासन हे सर्व करत असताना, शिक्षकांच्या बदल्यांची प्रक्रिया ही मार्च महिन्यापासून सुरू आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु