रत्नागिरी, 6 ऑक्टोबर, (हिं. स.) : कविकुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालयाच्या भारतरत्न डॉ पांडुरंग वामन काणे संस्कृत अध्ययन केंद्र रत्नागिरी उपकेंद्रात १० दिवसीय निःशुल्क योग प्रमाणपत्र अभ्यासक्रमाचा प्रारंभ आज झाला.
हे निःशुल्क योग शिबिर १६ ऑक्टोबर २०२५ दरम्यान अरिहंत मॉल येथील तिसऱ्या मजल्यावर असणाऱ्या रत्नागिरी संस्कृत उपकेंद्रात होणार आहे. प्रतिदिन सायंकाळी ५.३० वाजता हे योग वर्ग होणार असून याचा जास्तीत जास्त फायदा नोकरदार वर्गाला होऊ शकतो. सोबतच याचा आरोग्याच्या दृष्टीने फायदा स्त्रीवर्गाला होऊ शकतो. त्यामुळे रत्नागिरी शहरातील विद्यार्थी, नोकरदार, गृहिणी यांनी आरोग्य सुदृढ करणाऱ्या निःशुल्क योग प्रमाणपत्र अभ्यासक्रमासाठी प्रवेश घ्यावा. हा १० दिवसांचा अभ्यासक्रम पूर्ण झाल्यावर सहभागीना प्रमाणपत्रदेखील देण्यात येणार आहे. त्यामुळे जास्तीत जास्त स्थानिक रत्नागिरीकरांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन रत्नागिरी संस्कृत उपकेंद्राचे संचालक डॉ दिनकर मराठे यांनी केले आहे.
अजूनही ज्यांनी प्रवेश घेतला नसेल, त्यांनी अधिक माहितीसाठी योग प्रशिक्षक प्रा. अक्षय माळी (७७९८४९०६१५) यांच्याशी संपर्क साधावा. https://forms.gle/6S6zrJ8jcUE5tU5C8 या लिंकवर जाऊन नोंदणी करावी.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी