कोजागिरी पौर्णिमेनिमित्त तुळजाभवानीच्या दर्शनासाठी सोलापूरातून ४०० बसेसची सोय
सोलापूर, 6 ऑक्टोबर (हिं.स.)। कोजागिरी पौर्णिमेसाठी तुळजापूरला भवानीच्या दर्शनासाठी जाणार्‍या भाविकांसाठी राज्य परिवहन महामंडळाच्या येथील विभागीय कार्यालयाच्या वतीने अन्य विविध विभागांकडून चारशे वाढीव एसटी बसेसची सोय केली आहे. सोलापूरसह जिल्ह्याती
कोजागिरी पौर्णिमेनिमित्त तुळजाभवानीच्या दर्शनासाठी सोलापूरातून ४०० बसेसची सोय


सोलापूर, 6 ऑक्टोबर (हिं.स.)।

कोजागिरी पौर्णिमेसाठी तुळजापूरला भवानीच्या दर्शनासाठी जाणार्‍या भाविकांसाठी राज्य परिवहन महामंडळाच्या येथील विभागीय कार्यालयाच्या वतीने अन्य विविध विभागांकडून चारशे वाढीव एसटी बसेसची सोय केली आहे.

सोलापूरसह जिल्ह्यातील मंगळवेढा, सांगोला, दक्षिण व उत्तर व अक्कलकोटसह अन्य तालुक्याच्या ग्रामीण भागातील भाविक मोठ्या प्रमाणावर तुळजापूरला जातात. तसेच, जत तालुक्यातील भाविकही जातात. व, कर्नाटकातील विजापूर, गुलबर्गा यासह अन्य जिल्ह्यांतील भाविक तुळजापूरला पायी जात असतात. तुळजापूरहून परत गावाला जाताना भाविकांना एसटी सेवा पुरविते. प्रवास करतांंना कोणतीही अडचण भासू नये यासाठी सोलापूर तुळजापूर या मार्गावर 400 एसटी बसेसचे नियोजन केला आहे. महामंडळाच्या एसटी बसेसने प्रवास करणार्‍या महिलांना 50 टक्के व ज्येष्ठ नागरिकांससह अन्य लाभार्थ्यांना सवलतीतील प्रवास योजना लागू राहील.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande