मुखेड मतदार संघात निधी द्यावा, आमदार तुषार राठोडांची गडकरींकडे मागणी
नांदेड, 6 ऑक्टोबर (हिं.स.)। केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांची नागपूर येथे त्यांच्या निवासस्थानी मुखेडचे आमदार तुषार राठोड यांनी भेट घेऊन मतदारसंघातील रस्त्यांच्या रुंदीकरणासाठी आणि सुधारणेसाठी केंद्रीय मार्ग निधी अंतर्ग
अ


नांदेड, 6 ऑक्टोबर (हिं.स.)।

केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांची नागपूर येथे त्यांच्या निवासस्थानी मुखेडचे आमदार तुषार राठोड यांनी भेट घेऊन मतदारसंघातील

रस्त्यांच्या रुंदीकरणासाठी आणि सुधारणेसाठी केंद्रीय मार्ग निधी अंतर्गत कामाची मंजुरी देऊन निधी उपलब्ध करून देण्याची विनंती केली.

बेटमागरा-उच्चा- माऊली-एकलारा- नंदगांव- तडखेल भायेगांव - ढोसणी चाकुरजुन्ना-भुतानहिप्परगा- सोमुर- बेबरा मनुर- ते राज्यसिमा रस्ता-72. सा.क्र. 00/00 ते 12/00 ची रुंदीकरणासह सुधारणा करणे, ता. मुखेड जि.नांदेड.

सलगरा-कर्णा- हंगरगा -मोटारगा - एकलारा - सावरगांव- बन्नाळी प्ररामा-7 शहापूर-मलकापूर- शेळगांव सुकणी- MDR-71 सा.क्र. 0/00 ते 11/800 ची रुंदीकरणासह सुधारणा करणे, ता. मुखेड जि.नांदेड.

नांदेड जिल्ह्यातील कंधार तालुक्यातील जिल्हा सिमा कुरुळा- पोखणी- आंबुलगा - गौळ बोरी बु. - पेठवडज- गोणार- नारनाळी रस्त्यांची रुंदीकरणस्तव पुलमो-यासह सुधारणा करणे, प्रजिमा-89 कि.मी. 21/200 ते 32/800 (HAM-104 ते बोरी फाटा ते कळका ते पेठवडज) ता. कधार जि. नांदेड.

या रस्त्यांच्या रुंदीकरणासाठी आणि सुधारणेसाठी केंद्रीय मार्ग निधी अंतर्गत कामाची मंजुरी देऊन निधी उपलब्ध करून देण्याची विनंती केली.

यामुळे या भागातील जतेनाला दळणवळणासाठी खूप मदत होईल आणि विकासाला चालना मिळेल

हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis


 rajesh pande