नाशिकमध्ये खड्ड्यांच्या प्रश्नावरून शिवसेनेची निदर्शने
नाशिक, 6 ऑक्टोबर (हिं.स.)। नाशिक शहरातील खड्ड्यांचा प्रश्न आपला असून या प्रश्नावरून शिवसेना शिंदे पक्षाच्या वतीने महानगरपालिका आयुक्त कार्यालय बाहेर धरणे आंदोलन करण्यात आले तर शहर अभियंता यांच्या फोटोला जोडेमार आंदोलन करण्यात आले असून यावेळी प्रशासना
खड्ड्यांच्या प्रश्नावरून शिवसेना शिंदे पक्षाचे आयुक्त कार्यालयाबाहेर निदर्शने, शहर अभियंतांच्या फोटोला मारले जोडे


नाशिक, 6 ऑक्टोबर (हिं.स.)। नाशिक शहरातील खड्ड्यांचा प्रश्न आपला असून या प्रश्नावरून शिवसेना शिंदे पक्षाच्या वतीने महानगरपालिका आयुक्त कार्यालय बाहेर धरणे आंदोलन करण्यात आले तर शहर अभियंता यांच्या फोटोला जोडेमार आंदोलन करण्यात आले असून यावेळी प्रशासनाच्या वतीने येणारा आठ दिवसात शहरातील खड्डे बुजविण्याचे आश्वासन देण्यात आलेले आहे.

नाशिक शहरातील खड्ड्यांच्या प्रश्नावरून सर्वच राजकीय पक्ष हे वेगवेगळे आंदोलन करत आहेत तर रविवारी या खड्ड्यांच्या प्रश्नावरून राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना शिंदे पक्षाचे अध्यक्ष एकनाथ शिंदे यांनी थेट अधिकाऱ्यांवरती कारवाईचा इशारा दिला होता या सर्व प्रश्नावरती आता शिवसेना शिंदे पक्षाच्यावतीने सोमवारी सकाळी महानगरपालिका कार्यालयात जोरदार आंदोलन करण्यात आले

शिवसेना शिंदे पक्षाच्या युवा सेनेचे योगेश बिल्डर आणि माजी नगरसेविका हर्षदा गायकर यांच्यासह कार्यकर्ते हे महापालिका मुख्यालय राजीव गांधी भवन मध्ये पोहोचले या ठिकाणी त्यांनी थेट महापालिका आयुक्त कार्यालय आणि या ठिकाणी जोरदार घोषणाबाजी केली तर युवा सेनेच्या काही कार्यकर्त्यांनी थेट आयुक्त कार्यालयाच्या बाहेर ठिय्या आंदोलन केले आणि नाशिक शहर खड्डे मुक्त झालेच पाहिजे अशा स्वरूपाच्या घोषणा दिल्या. यावेळी संतप्त झालेल्या शिवसेना शिंदे पक्षाच्या कार्यकर्त्यांनी शहर अभियंता संजय अग्रवाल यांच्या प्रतिमेला जोडो मार आंदोलन केले आणि खड्डे मुक्त न करणाऱ्या अधिकाऱ्यांचा निषेध व्यक्त करणाऱ्या घोषणा दिल्या.

संतप्त आंदोलकांच्या भावना लक्षात घेऊन प्रशासनाच्या वतीने अतिरिक्त आयुक्त स्मिता झगडे यांनी आयुक्त कार्यालयामध्ये जाऊन आंदोलकांची भेट घेतली ज्यावेळी आंदोलकांनी शहरांमध्ये खड्ड्याने नागरिक कसे बेजार झालेले आहेत याबाबतचा पाढा वाचला नागरिकांना होणाऱ्या त्रासाबाबत प्रशासन माहिती असून देखील कानाडोळा करत आहे म्हणून हे आंदोलन करत असल्याचे यावेळी आंदोलनकर्त्यांनी सांगितले यावेळी प्रशासनाच्या वतीने भूमिका स्पष्ट करताना अतिरिक्त आयुक्त स्मिता दगडे यांनी सांगितले की येणाऱ्या आठ दिवसांमध्ये शहरातील खड्डे बुजवले जातील . प्रशासनाला सर्व काम करण्यासाठी थोडा अवधी लागणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले

अतिरिक्त आयुक्त स्मिता झगडे यांनी दिलेल्या आश्वासनानंतर माजी नगरसेविका आणि युवती सेनेच्या हर्षदा गायकर यांनी सांगितले की जर येणाऱ्या आठ दिवसांमध्ये हे खड्डे मिटले नाही तर यापेक्षाही उग्र आंदोलन शिवसेना करणार आहे असा इशारा त्यांनी यावेळी दिला

---------------

हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV


 rajesh pande