रत्नागिरी : स्वरूपानंद पतसंस्थेचे अर्थकारण आदर्श : प्रवीण दरेकर
रत्नागिरी, 6 ऑक्टोबर, (हिं. स.) : स्वामी स्वरूपानंद पतसंस्थेचे अर्थकारण आदर्शवत आहे. संस्थेच्या कामकाजात असलेले सातत्य, आर्थिक शिस्त आणि प्रमाणबद्धता हा विषय दुर्मिळ आहे, असे प्रतिपादन स्वयं, समूह पुनर्विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष प्रवीण दरेकर यांनी
स्वरूपानंद पतसंस्थेत प्रवीण दरेकर यांचा सत्कार


रत्नागिरी, 6 ऑक्टोबर, (हिं. स.) : स्वामी स्वरूपानंद पतसंस्थेचे अर्थकारण आदर्शवत आहे. संस्थेच्या कामकाजात असलेले सातत्य, आर्थिक शिस्त आणि प्रमाणबद्धता हा विषय दुर्मिळ आहे, असे प्रतिपादन स्वयं, समूह पुनर्विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष प्रवीण दरेकर यांनी केले.

दरेकर यांनी आज स्वामी स्वरूपानंद पतसंस्थेच्या प्रधान कार्यालयास सदिच्छा भेट दिली. त्यावेळी ते बोलत होते. श्री. दरेकर राज्य सहकार संघाचे अध्यक्ष झाले, पुनर्विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष म्हणून त्यांची नियुक्ती झाली व मंत्रिपदाचा दर्जा त्यांना देण्यात आला. या पार्श्वभूमीवर त्यांचा सत्कार स्वामी स्वरूपानंद पतसंस्थेचे अध्यक्ष ॲड. दीपक पटवर्धन यांनी शाल, देवी लक्ष्मीची प्रतिमा आणि पुष्पगुच्छ देऊन केला.

पतसंस्थेला भेट देऊन श्री. दरेकर यांनी संस्थेच्या व्यवहारांची माहिती त्यांनी घेतली. पतसंस्थेची उत्तम वसुली, दणदणीत स्वनिधी, संस्थेचा निव्वळ नफा या संदर्भाने ॲड. दीपक पटवर्धन यांचे खास अभिनंदन त्यांनी केले. संस्थेच्या काही मागण्या कर्जमर्यादा वाढ, पोट नियम दुरुस्ती या संदर्भात असलेल्या अडचणी समजावून घेऊन श्री. दरेकर यांनी थेट आयुक्तांबरोबर चर्चा केली व संस्थेच्या मागण्या मान्य कराव्यात, असे निर्देश अधिकाऱ्यांना दिले.यावेळी उपाध्यक्ष माधव गोगटे, संचालक अजित रानडे, श्री. लेले आदी संचालक, मुन्ना चवंडे, सचिन करमरकर, राजू तोडणकर आदी उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी


 rajesh pande