रत्नागिरी : महिला भाजपाच्या आरोग्य तपासणी शिबिराला प्रतिसाद
रत्नागिरी, 6 ऑक्टोबर, (हिं. स.) : भारतीय जनता पार्टी महिला मोर्चातर्फे जिल्हाध्यक्ष सौ. वर्षा परशुराम ढेकणे यांच्या पुढाकाराने प्रभाग क्रमांक १४, तेली आळी दत्त मंदिराजवळ महिलांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. त्याला चांगला प्रतिस
रत्नागिरी : महिला भाजपाच्या आरोग्य तपासणी शिबिराला प्रतिसाद


रत्नागिरी, 6 ऑक्टोबर, (हिं. स.) : भारतीय जनता पार्टी महिला मोर्चातर्फे जिल्हाध्यक्ष सौ. वर्षा परशुराम ढेकणे यांच्या पुढाकाराने प्रभाग क्रमांक १४, तेली आळी दत्त मंदिराजवळ महिलांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. त्याला चांगला प्रतिसाद मिळाला.

शिबिराचे उद्घाटन सौ. सत्यवती सत्यवान बोरकर यांच्या हस्ते करण्यात आले. महिलांच्या आरोग्याबाबत जागरूकता निर्माण व्हावी आणि त्यांना वेळेवर तपासणीची सुविधा मिळावी या हेतूने हे शिबिर आयोजित करण्यात आले होते. शिबिरात दातांची तपासणी, कर्करोग टाळण्यासाठी आवश्यक तपासणी करण्यात आली.

या उपक्रमात महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष सौ. वर्षा परशुराम ढेकणे, सौ. सत्यवती बोरकर, ओबीसी शहराध्यक्ष अमित विलणकर आदी मान्यवर उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी


 rajesh pande