आमदार बापू पठारेंना धक्काबुक्की; २० जणांविरूद्ध गुन्हा
पुणे, 6 ऑक्टोबर (हिं.स.)। राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे आमदार बापूसाहेब पठारे यांना धक्काबुक्की केल्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाच्या पदाधिकार्‍यांसह २० जणांविरूद्ध विमानतळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लो
आमदार बापू पठारेंना धक्काबुक्की; २० जणांविरूद्ध गुन्हा


पुणे, 6 ऑक्टोबर (हिं.स.)।

राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे आमदार बापूसाहेब पठारे यांना धक्काबुक्की केल्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाच्या पदाधिकार्‍यांसह २० जणांविरूद्ध विमानतळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लोहगावमधील गाथा लॉनमध्ये शनिवारी रात्री आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात ही घटना घडली होती.

आमदार पठारेंच्या वाहन चालकालाही बेदम मारहाण करून त्यांच्या गळ्यातील सोनसाखळी आणि खिशातील रोकड चोरून नेण्यात आल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. या प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे पदाधिकार्‍यांसह २० जणांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आमदार पठारे यांचे मोटार चालक शकील अजमोद्दीन शेख (रा. लोहगाव) यांनी विमानतळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande