जळगाव, 7 ऑक्टोबर, (हिं.स.) यंदा आपल्या परदेशातील नातेवाईक, मित्रपरिवार यांना डाक कार्यालायामार्फत आता परदेशात २० किलोपर्यंतचा दिवाळी फराळ पाठवता येणार आहे. कॅनडा, युएई, युके, सिंगापूर, ऑस्ट्रेलिया, रशिया, आयर्लंड यांसह तब्बल १२० देशांमध्ये अत्यंत वाजवी दरात पार्सल सेवा उपलब्ध आहे. पार्सलचे वजन व निवडलेल्या वाहतूक सेवा प्रकारानुसार दर निश्चित करण्यात आले आहेत.
भुसावळ प्रधान डाक कार्यालायात नागरिकांसाठी विशेष सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. पोस्टमन घरी येऊन पार्सल घेऊन जाण्याची सोय तसेच नाममात्र दरात पार्सल पॅकिंग सुविधा देखील देण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांना पार्सल पाठवताना सर्व सुविधा एकाच ठिकाणी मिळणार आहेत. या सुविधेचा लाभ घेण्यासाठी जवळच्या डाक कार्यालयात संपर्क साधावा, असे आवाहन भुसावळचे डाक अधीक्षक एम. एस. नवलू यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर