नाशिकमध्ये बनावट पावत्या बनवून शासनाच्या १ लाख रुपयांचा अपहार
नाशिक, 7 ऑक्टोबर, (हिं.स.) - नृत्य पथकातील कलाकारांना शासनातर्फे मिळालेली रक्कम बनावट पावत्या बनवून स्वतःच्या खात्यात घेऊन शासनाची १ लाख रुपयांची फसवणूक केल्याची घटना एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प येथे घडली. याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अश
नाशिकमध्ये बनावट पावत्या बनवून शासनाच्या १ लाख रुपयांचा अपहार


नाशिक, 7 ऑक्टोबर, (हिं.स.) - नृत्य पथकातील कलाकारांना शासनातर्फे मिळालेली रक्कम बनावट पावत्या बनवून स्वतःच्या खात्यात घेऊन शासनाची १ लाख रुपयांची फसवणूक केल्याची घटना एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प येथे घडली.

याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, सहाय्यक प्रकल्प अधिकारी असलेल्या आरोपी केतन भास्करराव पवार याने एका कार्यक्रमासाठी आदिवासी कला पथकांना बोलावले होते. पवारने ६ आदिवासी पथके आल्याचे दाखवून त्यांच्या नावे बनावट पावत्या बनवून त्यावर कला पथकांच्या प्रमुखांच्या खोट्या सह्या करून त्या पावत्या एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयास सादर केल्या होत्या.

या पावत्यांवरुन त्याने कला पथकांना शासनातर्फे मिळणारी रक्कम मंजूर करुन घेत कावनई आदिवासी नृत्य पथकातील कलाकारांना देय्य असलेली १ लाख १६० रुपये ही रक्कम स्वतःच्या खात्यात घेतली. तसेच खात्याचे मंत्री नाशिक येथील शासकीय विश्रामगृहात मुक्कामासाठी आले असता त्यांचा चहा, नास्ता, जेवण या व्यवस्था करण्यासाठी केतन पवारने ५४ हजार १४० रुपये स्वतःच्या खात्यात घेऊन शासनाची फसवणूक केली. ही रक्कम आदिवासी कलाकारांना देणे आवश्यक असताना केतन पवारने स्वखर्चित देय्यक काढून शासन निर्णयाचा भंग केला. के तन पवारला देयकासोबत जोडण्यात आलेल्या प्रमाणपत्राबाबत कोणतेही अधिकार देण्यात आलेले नसताना त्याने पारफॉर पेमेंट करुन शासकीय रकमेचा अपहार केल्याचे उघड झाले.याप्रकरणी महेश भिमशंकर कुलथे यांच्या फिर्यादीवरून मुंबई नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अतुल क्षिरसागर करीत आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV


 rajesh pande