बीड - ब्रम्हनाथ येळंब व निमगाव बंधाऱ्यांचे रुपांतरण काम मंजूर
बीड, 7 ऑक्टोबर (हिं.स.)। ब्रम्हनाथ येळंब व निमगाव बंधाऱ्यांचे रुपांतरण काम मंजूर करण्यात आले असल्याची माहिती आमदार सुरेश धस यांनी दिली. महाराष्ट्र शासनाच्या मान्यतेनंतर शिरूर (कासार) तालुक्यातील ब्रम्हनाथ येळंब व निमगाव को. प. बंधा-यांचे बॅरेज रु
अ


बीड, 7 ऑक्टोबर (हिं.स.)।

ब्रम्हनाथ येळंब व निमगाव बंधाऱ्यांचे रुपांतरण काम मंजूर करण्यात आले असल्याची माहिती आमदार सुरेश धस यांनी दिली.

महाराष्ट्र शासनाच्या मान्यतेनंतर शिरूर (कासार) तालुक्यातील ब्रम्हनाथ येळंब व निमगाव को. प. बंधा-यांचे बॅरेज रुपांतरण काम आता तत्काळ सुरू करण्यास प्रशासकीय मान्यता मिळाली आहे.

सदर कामासाठी रु. ब्रम्हनाथ येळंब ता. शिरुर (का).रु.१७ , ३० , १२ , ६०६ /- (रु.सतरा कोटी तीस लक्ष बारा हजार सहाशे सहा ) खर्चास मान्यता ते निमगाव ता. शिरुर (का).रू. २२,०८,९५,१५६/-

(रू. बावीस कोटी आठ लक्ष पंचान्नव हजार एकशे छपन्न )खर्चास मान्यता देण्यात आली आहे. या सुधारणा व रुपांतरणामुळे शेकडो हेक्टर सिंचन क्षेत्राचा लाभ शेतकऱ्यांना मिळणार आहे.

या निर्णयामुळे स्थानिक शेती, जलसाठा व्यवस्थापन आणि पावसाळ्यातील पाणीसाठ्याचे नियोजन यांना मोठा लाभ होणार आहे.

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande