छ. संभाजीनगर : खासदार बजरंग सोनवणेंनी घेतली जरांगेंची भेट
छत्रपती संभाजीनगर, 7 ऑक्टोबर (हिं.स.) मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची छत्रपती संभाजी नगर येथे बीड लोकसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार बजरंग सोनवणे यांनी भेट घेतली आहे. खासदार बजरंग सोनवणे यांनी छत्रपती संभाजी नगर येथे गॅलेक्सी हॉ
अ


छत्रपती संभाजीनगर, 7 ऑक्टोबर (हिं.स.) मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची छत्रपती संभाजी नगर येथे बीड लोकसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार बजरंग सोनवणे यांनी भेट घेतली आहे. खासदार बजरंग सोनवणे यांनी छत्रपती संभाजी नगर येथे गॅलेक्सी हॉस्पिटल येथे भेट घेऊन तब्येतीची विचारपूस केली. जरांगेंनी लवकर बरे व्हावे, निरोगी राहावे यासाठी मनापासून प्रार्थना केली तसेच पुढील काळात अधिक काळजी घेण्याची विनंती केली.गेल्या काही दिवसापासून मनोज जरांगे पाटील छत्रपती संभाजी नगर येथील रुग्णालयात उपचार घेत आहेत आज बीड जिल्ह्याचे खासदार पोहोचले होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande