पोलीस उपअधीक्षक पूजा पवार यांनी स्वीकारला बीड उपविभागाचा पदभार
बीड, 7 ऑक्टोबर, (हिं.स.)। पोलीस उपअधीक्षक पूजा पवार यांनी बीड उपविभागाचा पदभार स्वीकारला आहे.. यापूर्वी त्यांनी पिंपळनेर ठाण्याचा कारभार खूप चांगल्या प्रकारे सांभाळला होता.. महाराष्ट्र शासनाच्या आदेशानुसार पोलीस उपअधीक्षक श्रीमती पूजा पवार यां
अ


बीड, 7 ऑक्टोबर, (हिं.स.)।

पोलीस उपअधीक्षक पूजा पवार यांनी बीड उपविभागाचा पदभार स्वीकारला आहे.. यापूर्वी त्यांनी पिंपळनेर ठाण्याचा कारभार खूप चांगल्या प्रकारे सांभाळला होता..

महाराष्ट्र शासनाच्या आदेशानुसार पोलीस उपअधीक्षक श्रीमती पूजा पवार यांचा परीविक्षाधीन कालावधी पूर्ण झाल्याने त्यांना उपविभागीय पोलीस अधीकारी बीड म्हणुन शासनाकडून जबाबदारी देण्यात आली आहे..

त्यांच्या या निवडीचे स्वागत तालुकाभरातून झाले... बीड तालुक्यातील 5 पोलिस ठाण्याचा कारभार डीवायएसपी पूजा पवार यांच्या नेतृत्वाखाली कायद्याचे राज्य आणणारा ठरेल अशी अपेक्षा आहे..

---------------

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande