पुणे, 7 ऑक्टोबर (हिं.स.)सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील लोकमान्य टिळक अध्यासन, गणित विभाग आणि संत ज्ञानेश्वर अध्यासन यांच्या संयुक्त विद्यमाने “लोकमान्य टिळक स्मृती व्याख्यानमाला पुष्प – ४” अंतर्गत एक विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. या विशेष व्याख्यानात डॉ. अरुणा डेरे, अध्यासन प्रमुख, संत ज्ञानेश्वर अध्यासन, या “गीतारामायणातील काव्यसौंदर्य” या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत.हा कार्यक्रम बुधवार, ८ ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी ११.०० वाजता, गणित विभाग, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे येथे होणार आहे. तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे प्र-कुलगुरू प्रा. (डॉ.) परग काळकर हे असतील.
रामायण हे महर्षी वाल्मिकींचे अमर महाकाव्य असून, त्याचे गीतारामायण रूपांतर ग. दि. माडगूळकरांनी केले. त्यांच्या शब्दांना सुधीर फडके यांच्या सुरांनी आणि संगीताने सजीव रूप दिले. या गीतारामायणात दडलेले काव्यसौंदर्य, मराठी भाषेतील सुसंस्कृत अभिव्यक्ती, आणि भावसंपन्नता यांचे दर्शन घडविणारा हा व्याख्यानाचा सोहळा ठरणार आहे. या व्याख्यानाचे संयोजन प्रा. यशवंत बोरसे, प्रमुख, गणित विभाग, तसेच डॉ. दिलीप शेट, प्रमुख, लोकमान्य टिळक अध्यासन, यांनी केले आहे असून विद्यापीठातील सर्व शिक्षक, विद्यार्थी आणि रसिकांना या व्याख्यानासाठी उपस्थित राहण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु