पंतप्रधान मोदींनी पुतिन यांना फोन करून दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
नवी दिल्ली , 8 ऑक्टोबर (हिं.स.)। रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन यांचा मंगळवारी (७ ऑक्टोबर) रोजी ७३ वा वाढदिवस होता. यानिमित्त पंतप्रधान मोदी यांनी पुतिन यांना फोन करून उत्तम आरोग्यासाठी आणि यशासाठी त्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी केवळ औपचारिकच
पंतप्रधान मोदींनी पुतिन यांना फोन करून दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा


नवी दिल्ली , 8 ऑक्टोबर (हिं.स.)। रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन यांचा मंगळवारी (७ ऑक्टोबर) रोजी ७३ वा वाढदिवस होता. यानिमित्त पंतप्रधान मोदी यांनी पुतिन यांना फोन करून उत्तम आरोग्यासाठी आणि यशासाठी त्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी केवळ औपचारिकच नव्हे, तर भारत-रशिया संबंध अधिक मजबूत करण्याच्या आणि दीर्घकाळ चालणाऱ्या रणनीतिक भागीदारीला प्राधान्य देण्यावरही चर्चा झाली. याआधी पुतिन यांनीही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना फोन करून त्यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या होत्या.

रशियन राष्ट्राध्यक्षांच्या कार्यालयाने जारी केलेल्या निवेदनानुसार, दोन्ही नेत्यांनी भारत आणि रशियाच्या रणनीतिक भागीदारीला नव्या उंचीवर नेण्यासंदर्भात चर्चा केली. याच बरोबर, डिसेंबर महिन्यात होणाऱ्या पुतिन यांच्या भारत दौऱ्यासंदर्भातही यावेळी चर्चा झाली. माहितीनुसार, पुतिन यांचा दौरा ५ डिसेंबरच्या आसपास होण्याची शक्यता आहे. दरम्यान, डिसेंबरमध्ये होणाऱ्या २३ व्या भारत-रशिया शिखर संमेलनात आपण राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचे स्वागत करण्यास अत्यंत उत्सुक आहेत, असे पंतप्रधान मोदी यांनी म्हटले आहे.

या फोन कॉलच्या आधीच पुतिन यांनी नुकत्याच एका भाषणात पंतप्रधान मोदी आणि भारतीय जनतेचं उघडपणे कौतुक केलं. ते म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारत स्वतंत्र आणि सार्वभौम धोरण अवलंबत आहे. विशेषतः आर्थिक क्षेत्रात भारताची कामगिरी प्रशंसनीय आहे. सर्वाधिक विकास दरासह भारत जगातील प्रमुख अर्थव्यवस्थांमध्ये सामील झाला आहे. पुतिन यांनी भारत-रशिया संबंधांचे महत्त्व अधोरेखित करताना सांगितले, “माझा विश्वास आहे की भारतीय लोक हे संबंध आणि यामागील इतिहास विसरणार नाहीत. जवळपास १५ वर्षांपूर्वी आपण विशेष रणनीतिक भागीदारी जाहीर केली होती.”पुतिन यांच्या भारत दौऱ्याच्या आधी रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्गेई लावरोव पुढील महिन्यात दिल्ली दौऱ्यावर येणार असल्याची शक्यता आहे, जेणेकरून राष्ट्रपतीच्या दौऱ्याची रूपरेषा ठरवता येईल. पुतिन यांनी शेवटचा दौरा डिसेंबर २०२१ मध्ये केला होता. फेब्रुवारी २०२२ मध्ये युक्रेन युद्ध सुरू झाल्यापासून ही त्यांची भारतातील पहिली भेट असेल.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande