वैष्णोदेवी यात्रा तीन दिवसांनंतर पुन्हा सुरू
कटरा, ८ ऑक्टोबर (हिं.स.) प्रतिकूल हवामानामुळे तीन दिवस थांबलेली वैष्णोदेवी यात्रा आज पुन्हा सुरू झाली. मुसळधार पाऊस आणि त्रिकुट पर्वतरांगेत भूस्खलन होण्याची शक्यता असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून ही यात्रा थांबवण्यात आली होती. हवामान सुधारताच, अधिक
वैष्णव देवी यात्रा


कटरा, ८ ऑक्टोबर (हिं.स.) प्रतिकूल हवामानामुळे तीन दिवस थांबलेली वैष्णोदेवी यात्रा आज पुन्हा सुरू झाली. मुसळधार पाऊस आणि त्रिकुट पर्वतरांगेत भूस्खलन होण्याची शक्यता असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून ही यात्रा थांबवण्यात आली होती.

हवामान सुधारताच, अधिकाऱ्यांनी सर्व सुरक्षा उपाययोजनांची खात्री करून यात्रेकरूंसाठी मार्ग पुन्हा उघडले. तीर्थक्षेत्र मंडळाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, तीर्थक्षेत्र सुरळीतपणे पुन्हा सुरू झाले आहे आणि यात्रेकरूंना तीर्थक्षेत्राकडे जाण्याची परवानगी देण्यात येत आहे.अधिकाऱ्यांनी यात्रेकरूंना अधिकृत माध्यमांद्वारे अपडेट राहण्याचे आणि प्रवासादरम्यान सुरक्षा सूचनांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे. तीर्थक्षेत्र मंडळाने एका अधिकृत निवेदनात म्हटले होते की , आयएमडीच्या हवामान सल्ल्यानुसार, वैष्णोदेवी यात्रा ५ ते ७ ऑक्टोबर दरम्यान स्थगित करण्यात येईल आणि ८ ऑक्टोबर रोजी पुन्हा सुरू झाली.

---------------

हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे


 rajesh pande