सौर ऊर्जा उत्पादनात भारत जगात तिसऱ्या स्थानावर- प्रल्हाद जोशी
नवी दिल्ली, 09 ऑक्टोबर (हिं.स.) : सुमारे 125 गीगावॅट सौर क्षमतेसह भारत आता जगातील तिसरा सर्वात मोठा सौर ऊर्जा उत्पादक देश बनल्याचे केंद्रीय नवीन व नवीकरणीय ऊर्जा मंत्री प्रह्लाद जोशी यांनी सांगितले. नवीन व नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयाने दिलेल्या अधिकृ
संग्रहित


नवी दिल्ली, 09 ऑक्टोबर (हिं.स.) : सुमारे 125 गीगावॅट सौर क्षमतेसह भारत आता जगातील तिसरा सर्वात मोठा सौर ऊर्जा उत्पादक देश बनल्याचे केंद्रीय नवीन व नवीकरणीय ऊर्जा मंत्री प्रह्लाद जोशी यांनी सांगितले.

नवीन व नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयाने दिलेल्या अधिकृत माहितीनुसार, आंतरराष्ट्रीय सौर संघटनेच्या (आयएसए) सभेचे आठवे सत्र 27 ते 30 ऑक्टोबर 2025 दरम्यान ‘भारत मंडपम’, नवी दिल्ली येथे आयोजित करण्यात येणार आहे. हा कार्यक्रम ‘एक सूर्य, एक दृष्टिकोन आणि सौर ऊर्जेप्रती एक सामायिक बांधिलकी’ या संकल्पनेखाली संपूर्ण जगाला एकत्र आणणार आहे.

कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी मंत्री जोशी म्हणाले की, भारताने आपले नवीकरणीय ऊर्जा क्षेत्रातील लक्ष्य ठरवलेल्या वेळेच्या पाच वर्षे आधीच गाठले असून, गैर-जीवाश्म इंधनांपासून मिळणाऱ्या एकूण स्थापीत वीज क्षमतेपैकी 50 टक्क्यॉंहून अधिक हिस्सा प्राप्त केला आहे.

त्यांनी सांगितले की, भारताची सौर ऊर्जा क्षेत्रातील ही प्रगती हे दर्शवते की राष्ट्रीय स्तरावरील महत्त्वाकांक्षा स्थानिक पातळीवर परिणामकारक परिवर्तनात रूपांतरित होऊ शकते.

प्रह्लाद जोशी म्हणाले की,“आमच्या यशाची कहाणी ही केवळ आकडेवारीपुरती मर्यादित नाही; ती लोकांबद्दल आहे. विकेंद्रीकृत सौर ऊर्जा गावांमध्ये प्रकाश पोहोचवते, आरोग्य केंद्रांना वीजपुरवठा करते आणि शेतकऱ्यांना नवीन तंत्रज्ञानाचे लाभ मिळवून देते असे त्यांनी सांगितले.

'पंतप्रधान सूर्य घर – मोफत वीज योजना' अंतर्गत आतापर्यंत 20 लाखांहून अधिक कुटुंबांना सौर ऊर्जेचा थेट लाभ झाला असल्याचेही त्यांनी अधोरेखित केले.

पीएम-कुसुम योजनेबद्दल बोलताना जोशी म्हणाले की, या योजनेच्या 3 प्रमुख घटकांमध्ये 10 गीगावॅट लहान सौर प्रकल्पांची उभारणी, 14 लाख ऑफ-ग्रिड सौर पंपांना सहाय्य आणि

35 लाख ग्रिडशी जोडलेल्या कृषी पंपांना सौर ऊर्जेशी जोडणेयांचा समावेश आहे. हे सर्व प्रयत्न मिळून शाश्वत आणि स्वच्छ ऊर्जा शेवटच्या टप्प्यापर्यंत पोहोचवण्याचे उद्दिष्ट साध्य करत आहेत.

नवीन व नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयाचे सचिव संतोष कुमार सारंगी यांनी नमूद केले की,

“आज आपण सौर ऊर्जेमध्ये तिसऱ्या क्रमांकावर, पवन ऊर्जेमध्ये चौथ्या क्रमांकावर आणि एकूण नवीकरणीय ऊर्जेच्या स्थापनेत देखील जगात तिसऱ्या क्रमांकावर पोहोचलो आहोत. यासोबतच, सौर मॉड्यूलच्या निर्मितीत भारत चीननंतर दुसऱ्या क्रमांकावर आहे.”

आंतरराष्ट्रीय सौर संघटनेचे महासंचालक आशीष खन्ना यांनी सांगितले की,

“ग्लोबल रिन्यूएबल एनर्जी क्षेत्र एका निर्णायक वळणावर आहे. तेलाला 1000 गीगावॅट क्षमतेपर्यंत पोहोचायला 25 वर्षे लागली, तर नवीकरणीय ऊर्जेने केवळ दोन वर्षांत ही क्षमता दुप्पट केली आहे.”---------------

हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी


 rajesh pande