श्री स्वामी अन्नछत्र मंडळाची पूरग्रस्तांना ५० लाखांची मदत
सोलापूर, 9 ऑक्टोबर (हिं.स.)। अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ (ट्रस्ट) यांच्या वतीने सोलापूर जिल्ह्यामध्ये उद्भवलेल्या पूर परिस्थितीत बाधित नागरिकांना ५० लाख रुपयांचे जीवनावश्यक धान्य शिधा किट सुमारे ५ हजार नग आणि अन्नछत्र मंडळाची सह
श्री स्वामी अन्नछत्र मंडळाची पूरग्रस्तांना ५० लाखांची मदत


सोलापूर, 9 ऑक्टोबर (हिं.स.)।

अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ (ट्रस्ट) यांच्या वतीने सोलापूर जिल्ह्यामध्ये उद्भवलेल्या पूर परिस्थितीत बाधित नागरिकांना ५० लाख रुपयांचे जीवनावश्यक धान्य शिधा किट सुमारे ५ हजार नग आणि अन्नछत्र मंडळाची सहयोगी संस्था, हिरकणी महिला बहुउद्देशीय संस्था यांच्या वतीने १ हजार पूरग्रस्त महिलांना साडी वाटप करण्यात येणार असल्याची माहिती न्यासाचे कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे भोसले यांनी पत्रकार परिषदेत दिली. या पत्रकार परिषदेस सचिव शामराव मोरे, मनोज निकम, अरविंद शिंदे उपस्थित होते.

भोसले पुढे म्हणाले, सोलापूर जिल्ह्यामध्ये उद्भवलेल्या पूर परिस्थितीमध्ये बाधित नागरिकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. सोलापूर जिल्हाधिकारी यांनी केलेल्या आवाहनानुसार बाधित नागरिकांना सुमारे ५० लाखाचे रुपयांचे जीवनावश्यक धान्य शिध्याचे ५ हजार नग अन्नछत्र मंडळ यांच्याकडून व न्यासाची सहयोगी संस्था, हिरकणी महिला बहुउद्देशीय संस्थेच्या, संस्थापक अध्यक्ष अलकाताई जन्मेजयराजे भोसले, यांच्या मार्गदर्शनाखाली आणि संस्थापक सचिव अर्पिताराजे अमोलराजे भोसले, यांच्या नेतृत्वाखाली पूरग्रस्त महिलांसाठी १ हजार साडीचोळीचे पूरग्रस्तांना वाटप करणार आहोत.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande