सोलापूर जिल्ह्यातील पूरग्रस्त ८२ गावांत आरोग्य, स्वच्छतेची मोहीम
सोलापूर, 9 ऑक्टोबर, (हिं.स.)। जिल्ह्यात अतिवृष्टी व पुरामुळे जवळपास सहा तालुक्यांतील ८२ गावांमध्ये पाणी शिरले. सद्यस्थितीत या गावांमधून पाणी कमी होत आहे किंवा अनेक गावांमधून पाणी पूर्णपणे ओसरले आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या यंत्रणाकडून या सर्व गा
सोलापूर जिल्ह्यातील पूरग्रस्त ८२ गावांत आरोग्य, स्वच्छतेची मोहीम


सोलापूर, 9 ऑक्टोबर, (हिं.स.)। जिल्ह्यात अतिवृष्टी व पुरामुळे जवळपास सहा तालुक्यांतील ८२ गावांमध्ये पाणी शिरले. सद्यस्थितीत या गावांमधून पाणी कमी होत आहे किंवा अनेक गावांमधून पाणी पूर्णपणे ओसरले आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या यंत्रणाकडून या सर्व गावांमध्ये स्वच्छता मोहीम हाती घेण्यात आल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी दिली.

सोलापूर जिल्ह्यात अतिवृष्टी झाल्याने नदी, ओढे, नाले भरून वाहत आहेत. पूरग्रस्त भागात स्वच्छतेची कामे व उपाययोजना करण्यासाठी व्यापक स्वरूपात मोहीम हाती घेण्यात आलेल्या असून, या सर्व गावांमध्ये आरोग्य शिबिरे घेऊन नागरिकांच्या आरोग्याची तपासणी करण्यात आल्याची माहिती जंगम यांनी दिली. पूरनंतर आजारांची लागण, दूषित पाणी व घाण साचून राहणे यातून गंभीर प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असल्याने आरोग्य व स्वच्छता मोहीम घेण्यात आली आहे. सर्व ८२ गावांतील सार्वजनिक ठिकाणी मोहीम सुरू राहणार आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande