सोलापूर - मुख्याध्यापकाने बनावट कागदपत्राद्वारे हडपले शिक्षकाचे लाखाे रुपये
सोलापूर, 9 ऑक्टोबर, (हिं.स.)। खासगी विना अनुदानित शाळेवर एकही दिवस न आलेल्या शिक्षकाच्या शैक्षणिक व व्यावसायिक कागदपत्रांचा गैरवापर करून खोटे हिशोब बनवून व बनावट स्वाक्षरी करून सुमारे साडेतीन लाख रुपये हडप केल्याप्रकरणी आलेगाव खुर्द (ता. माढा) येथी
सोलापूर - मुख्याध्यापकाने बनावट कागदपत्राद्वारे हडपले शिक्षकाचे लाखाे रुपये


सोलापूर, 9 ऑक्टोबर, (हिं.स.)। खासगी विना अनुदानित शाळेवर एकही दिवस न आलेल्या शिक्षकाच्या शैक्षणिक व व्यावसायिक कागदपत्रांचा गैरवापर करून खोटे हिशोब बनवून व बनावट स्वाक्षरी करून सुमारे साडेतीन लाख रुपये हडप केल्याप्रकरणी आलेगाव खुर्द (ता. माढा) येथील सरस्वती विद्यालयाचे मुख्याध्यापक बाळासाहेब केचे यांना टेंभुर्णी पोलिसांनी अटक केली. माढा न्यायालयात हजर केले असता त्यांना पोलिस कोठडी सुनावली आहे.

सोलापूर येथील माध्यमिक शिक्षण विभागाच्या वेतन व भविष्य निर्वाह निधी पथकाचे तत्कालीन अधीक्षक विठ्ठल दिगंबर ढेपे (वय ४६ रा. सोलापूर) यांनी ८ मार्च २०२३ रोजी टेंभुर्णी पोलिसात फिर्याद दाखल केली होती. माढा तालुक्यातील जिजामाता शिक्षण प्रसारक मंडळ टाकळी (टें) संचलित आलेगाव खुर्द (ता. माढा) येथील सरस्वती विद्यालयाला टप्पा अनुदान मिळाले होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande