जळगाव जिल्ह्यातील 18 नगरपरिषद व नगरपंचायतींच्या निवडणुकांसाठी तयारी पूर्ण
जळगाव, 10 नोव्हेंबर (हिं.स.) राज्य निवडणूक आयोगामार्फत जळगाव जिल्ह्यातील नगरपरिषद आणि नगरपंचायतींच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला असून, जिल्हा प्रशासनाकडून सर्व तयारी पूर्ण करण्यात आलेली आहे. जिल्ह्यातील एकूण 19 नगरपरिषदांपैकी बोदवड येथ
जळगाव जिल्ह्यातील 18 नगरपरिषद व नगरपंचायतींच्या निवडणुकांसाठी तयारी पूर्ण


जळगाव, 10 नोव्हेंबर (हिं.स.) राज्य निवडणूक आयोगामार्फत जळगाव जिल्ह्यातील नगरपरिषद आणि नगरपंचायतींच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला असून, जिल्हा प्रशासनाकडून सर्व तयारी पूर्ण करण्यात आलेली आहे. जिल्ह्यातील एकूण 19 नगरपरिषदांपैकी बोदवड येथे आधीच नगरपरिषद अस्तित्वात असल्यामुळे उर्वरित 18 ठिकाणी निवडणूक होणार आहे.या निवडणुकीत भुसावळ ही ‘अ’ वर्ग नगरपरिषद, अमळनेर, चाळीसगाव, चोपडा, जामनेर आणि पाचोरा या ‘ब’ वर्ग नगरपरिषद, तर यावल, नशिराबाद, वरणगाव, पारोळा, भडगाव,धरणगाव, सावदा, रावेर, एरंडोल आणि फैजपूर, या ‘क’ वर्ग नगरपरिषद आहेत. शेंदूर्णी आणि मुक्ताईनगर या दोन नगरपंचायती आहेत.एकूण 464 सदस्य पदांसाठी निवडणूक होणार असून, एकूण प्रभागांची संख्या 246 आहे. जिल्ह्यातील मतदारसंख्या 8,89,914 इतकी असून, त्यात पुरुष 4,50,893, महिला 4,38,938 आणि इतर 83 मतदारांचा समावेश आहे. जिल्ह्यात 977 मतदान केंद्रे तयार करण्यात आली आहेत. प्रत्येक मतदान केंद्रावर आवश्यक (रॅम्प, पिण्याचे पाणी, स्वच्छता, विज, प्रकाशव्यवस्था आदी) उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. काही ठिकाणी किरकोळ दुरुस्तीची कामे सुरू आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर


 rajesh pande