
पाटणा, 15 नोव्हेंबर (हिं.स.)। बिहारमधील मुझफ्फरपूर येथे काल रात्री उशिरा शॉर्ट सर्किटमुळे लागलेल्या आगीत एकाच कुटुंबातील पाच जण जिवंत जळाले. इतर पाच जण गंभीर भाजले असून त्यांना वैद्यकीय महाविद्यालयात नेण्यात आले आहे.
पश्चिम विभागाच्या पोलीस उपअधीक्षक सुचित्रा कुमारी यांनी पाच जणांच्या मृत्यूची पुष्टी केली. कुटुंबातील सदस्यांना पळून जाता आले नाही त्या मुळे त्यांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये दोन मुले, त्यांचे पालक आणि आणखी एका सदस्याचा समावेश आहे.घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल आणि पोलिस घटनास्थळी पोहोचले, परंतु तोपर्यंत आगीने घराला वेढले होते. स्थानिक रहिवाशांच्या मदतीने आग आटोक्यात आणण्यात आली गेली. जखमींना तात्काळ वैद्यकीय महाविद्यालयात पाठवण्यात आले.पश्चिम विभागाच्या पोलीस उपअधीक्षकांनी सांगितले की, प्रथमदर्शनी शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचे दिसून येत आहे. फॉरेन्सिक टीम घटनास्थळी पोहोचली आहे; तपासानंतर नेमके कारण स्पष्ट होईल.
---------------
हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule