गुजरात : एटीएसकडून खलिस्तानी दहशतवाद्याला अटक
अहमदाबाद, 15 नोव्हेंबर (हिं.स.) : गुजरात पोलिसांच्या दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) हलोल येथून गुरप्रीत सिंग नामक दहशतवाद्याला अटक केली आहे. गुरप्रीतवर पंजाबमध्ये ग्रेनेड हल्ले आणि शस्त्रांच्या तस्करीचा आरोप आहे. तपासात असे स्पष्ट झाले की या प्रकरण
अटक लोगो


अहमदाबाद, 15 नोव्हेंबर (हिं.स.) : गुजरात पोलिसांच्या दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) हलोल येथून गुरप्रीत सिंग नामक दहशतवाद्याला अटक केली आहे. गुरप्रीतवर पंजाबमध्ये ग्रेनेड हल्ले आणि शस्त्रांच्या तस्करीचा आरोप आहे. तपासात असे स्पष्ट झाले की या प्रकरणातील मुख्य आरोपी मलेशियात आहेत आणि ते आयएसआयच्या निर्देशानुसार पंजाबमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्नात आहेत.

यासंदर्भात एटीएसने सांगितले की, दहशतवादी गुरप्रीत सिंग उर्फ गोपी बिल्ला याला राज्याच्या पंचमहल जिल्ह्यातील हलोल शहरातून त्याला ताब्यात घेण्यात आले असून यासंबंधीची माहिती पंजाब पोलिसांनी एटीएसला दिली आहे. गुरप्रीत सिंगला पंजाब पोलिसांच्या ताब्यात देण्यात येईल. गुरप्रीतवर पंजाबच्या गुरदासपूर जिल्ह्यात ग्रेनेड स्फोट घडवून आणणे आणि पाकिस्तानस्थित दहशतवादी नेटवर्कला मदत केल्याचे गुन्हे दाखल आहेत. प्राथमिक तपासातून उघड झाले की या प्रकरणातील मुख्य आरोपी मनु अगवान आणि मनींदर बिल्ला सध्या मलेशियात आहेत. ते पाकिस्तानी गुप्तचर संस्था आयएसआयच्या सूचनेनुसार पंजाबमध्ये दहशत पसरवण्यासाठी लोकांची भरती करत होते. पंजाब तसेच इतर राज्यांतील गर्दीच्या भागात ग्रेनेड हल्ले करून दहशत निर्माण करणे हे त्यांचे उद्दिष्ट होते.

पंजाब पोलिसांनी काही दिवसांपूर्वी अटक करण्यात आलेल्या दोन आरोपींना चौकशीदरम्यान गुरप्रीत सिंगच्या भूमिकेबाबत माहिती मिळाली. तो दोन ग्रेनेड आणि दोन पिस्तुलांची तस्करी तसेच हल्ल्यांच्या कटात सहभागी होता. मिळालेल्या माहितीनंतर एटीएसची टीम हलोल येथे पोहोचली आणि गुरप्रीत सिंग एका कारखान्यात मजूर म्हणून काम करत असल्याचे समजले. त्याला एका हॉटेलमधून ताब्यात घेऊन पुढील चौकशीसाठी नेण्यात आले. चौकशीत गुरप्रीत सिंगने ग्रेनेड हल्ल्याच्या कटात सहभागी असल्याची कबुली दिली आहे.

----------------------------

हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी


 rajesh pande