नाशिक -नगराध्यक्ष पदासाठी जोरदार रस्सीखेच
नाशिक, 15 नोव्हेंबर (हिं.स.)नाशिक जिल्ह्यात होत असलेल्या अकरा नगरपालिकांच्या नगर अध्यक्ष पदासाठी राजकीय पक्षांमध्ये मोठा संघर्ष सुरू असून अद्याप पर्यंत थेट जनतेतून निवडून देण्यात येणाऱ्या नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल झालेला नाही मात्र हे स
नगराध्यक्ष पदासाठी  जोरदार रस्सीखेच, युतीचा वरचष्मा तर मविआ ची  दमछाक , नांदगाव -मनमाड - येवल्यात युतीत  दावे - प्रति दावे


नाशिक, 15 नोव्हेंबर (हिं.स.)नाशिक जिल्ह्यात होत असलेल्या अकरा नगरपालिकांच्या नगर अध्यक्ष पदासाठी राजकीय पक्षांमध्ये मोठा संघर्ष सुरू असून अद्याप पर्यंत थेट जनतेतून निवडून देण्यात येणाऱ्या नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल झालेला नाही मात्र हे सर्व घडत असताना अद्याप पर्यंत महाविकास आघाडीकडे उमेदवारांची कमतरता असल्याचे तरी दिसून येत आहे . आता उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी म्हणून अवघ्या दोन दिवसाचा कालावधी शिल्लक राहिलेला आहे त्यामुळे कोण उमेदवारी अर्ज दाखल करणार याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेले आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार की नाही याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेले होते यात मधल्या कालावधीत सर्वोच्च न्यायालयाने 31 जानेवारी 26 पर्यंत सर्व निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्याचे आदेश दिले त्यानंतर राज्य निवडणूक आयोगाने पुढील पावले उचलण्यास सुरुवात केली तर निवडणुका होऊ नये मतदार यादी चुकीची आहे या सर्व पार्श्वभूमी वरती शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि काँग्रेस यांची महाविकास आघाडी आणि यांच्या जोडीला महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांनी आक्षेप घेतला तरी देखील त्याकडे दुर्लक्ष करून राज्य निवडणूक आयोगाने मतदार याद्यांमध्ये सुधारणा करत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम हा घोषित केला त्यामध्ये सर्वात प्रथम नगरपालिका निवडणुका घेण्याची घोषणा केली.

हे सर्व घडत असताना दुसरीकडे मात्र जिल्ह्यात निवडणूक कार्यक्रम सुरू होऊन आता हा कार्यक्रम म्हणजेच उमेदवारी अर्ज पूर्ण दाखल करण्याची प्रक्रिया संपत आलेली आहे ही प्रक्रिया संपण्यासाठी अवघ्या दोन दिवसाचा म्हणजेच 17 नोव्हेंबर पर्यंतचा वेळ शिल्लक आहे 18 तारखेला या अर्जांची छाननी होणार आहे जिल्ह्यामध्ये एकूण 11 नगरपालिकांमध्ये थेट नगराध्यक्षाची निवडणूक नागरिकांमधून होणार आहे त्यामुळे या ठिकाणी कोण उमेदवार होणार याकडे सर्वांचेच लक्ष लागलेलं आहे.

जिल्ह्यामध्ये 11 नगरपालिकांच्या निवडणुकीमध्ये उमेदवार कोण काय कसा यावरून नागरिकांमध्ये चर्चा सुरू असतानाच राजकीय स्तरावर ती मात्र महाविकास आघाडीची मोठी कोडी झाल्याचे दिसून येत आहे. जिल्ह्यातील अकरा नगरपालिकांमध्ये इगतपुरी नगरपालिकेमध्ये भाजपामध्ये दाखल झालेले संजय इंदुलकर हे महाविकास आघाडीकडून उमेदवारी करणार होते परंतु शेवटच्या क्षणी ते भाजपमध्ये दाखल झाले सिन्नर नगरपालिकेमध्ये हेमंत वाजे हे महाविकास आघाडीचे उमेदवार होते ते शिवसेना शिंदे पक्षाकडून उमेदवार होणार असे निश्चित होत असतानाच त्यांना भाजपाने अवताण धाडले आणि ते भाजपामध्ये दाखल झाले. पिंपळगाव बसवंत नगरपालिकेमध्ये पहिल्यांदीच नगरपालिकेची निवडणूक होत आहे आणि थेट जनतेतून नगराध्यक्षाची निवडणूक होणार आहे या ठिकाणी दोन्ही भाऊ म्हणजेच आमदार दिलीप बनकर आणि भास्कर बनकर हे दोघेही एकत्र आल्यामुळे महाविकास आघाडीची मोठी पंचायत झाली आहे शरद पवार गटाकडून महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून भास्कर बनकर यांना नगराध्यक्ष पदाची माळ घातली जाणार होती. परंतु राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाला या ठिकाणी संधी असल्यामुळे त्यांनी भास्कर बनकर यांना प्रवेश देऊन थेट नगराध्यक्ष पदाचे उमेदवार करण्याचं चालविले आहे ओझर नगरपालिकेमध्ये भाजपा विरुद्ध उबाठा यांची शिवसेना यांच्यामध्ये लढत होणार आहे नगराध्यक्ष पदासाठी या ठिकाणी बीजेपी कडून जिल्हाध्यक्ष यतीन कदम यांचे नाव जवळजवळ निश्चित मानलं जात आहे. तर शिवसेनेकडे मात्र उमेदवार नाही त्यामुळे अडचणी निर्माण झालेले आहे. भगूर नगरपालिकेमध्ये शिवसेना शिंदे गटाकडे ज्येष्ठ नेते विजय करंजकर यांच्या पत्नी अनिता करंजकर या उमेदवार आहेत तर महाविकास आघाडीकडे अजून पर्यंत उमेदवारासाठी कोणी इच्छुक नाही त्रंबक नगरपालिकेमध्ये भाजपाचे कैलास घुले आणि महाविकास आघाडीकडून कैलास खांडवाले यांच्यामध्ये लढत होत आहे परंतु इथेही अजून पर्यंत निश्चितच कोणतीही भूमिका स्पष्ट केली जात नाही.

चांदवड नगरपालिकेमध्ये काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष शिरीष कोतवाल किंवा त्यांचा मुलगा हा नगराध्यक्ष पदासाठी उमेदवार होतं परंतु एकूणच महाविकास आघाडी समोर असणाऱ्या अडचणींचा डोंगर बघता शिरीष कोतवाल यांनी शेवटच्या क्षणी भाजपामध्ये प्रवेश केला त्यामुळे आता या ठिकाणी देखील महाविकास आघाडीकडे उमेदवाराची अडचण आहे आणि भाजपला सक्षम असा उमेदवार नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीसाठी मिळाला आहे

जिल्ह्यातील नांदगाव मनमाड येवला नगरपालिकेची निवडणूक रोमांचक स्थितीत पोहोचली आहे या ठिकाणी महायुतीमध्ये जोरदार रस्सीखेच दिसून येत आहे विद्यमान आमदार सुहास कांदे आणि माजी खासदार समीर भुजबळ यांच्यामध्ये या तीनही मतदार संघात रस्सीखेच होत आहे त्यामुळे महाविकास आघाडीने अजून पर्यंत उमेदवारांच्या बाबतीत निर्णय घेतले नसल्याचे या पक्षातील नेते सांगत आहे महायुतीमध्ये निर्णय झाल्यानंतर या ठिकाणी पुढील निर्णय होणार आहे सटाणा नगरपालिकेच्या संदर्भामध्ये देखील महायुती आणि महाविकास आघाडी एकमेकांच्या उमेदवारांवरती लक्ष ठेवून आहेत त्यामुळे येथेही निर्णय होत नाही अशी परिस्थिती सध्या जिल्ह्यामध्ये दिसून येत आहे. एकुण काय तर नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीसाठी जिल्ह्यामध्ये महाविकास आघाडीला मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे तर सत्ताधारी महायुती थेट जिल्ह्यामध्ये आपले वर्चस्व निर्माण करण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसून येत आहे असे मत या क्षेत्रातील जाणकारांनी व्यक्त केले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV


 rajesh pande