कोलकात्याच्या बारा बाजार मार्केटमध्ये भीषण आग, अनेक दुकाने जळून खाक
कोलकाता, १५ नोव्हेंबर (हिं.स.) कोलकात्याच्या बारा बाजार मार्केटमध्ये शनिवारी सकाळी भीषण आग लागली. एज्रा स्ट्रीटवरील एका इलेक्ट्रिक वस्तूंच्या दुकानात लागलेल्या आगीमुळे संपूर्ण परिसरात घबराट पसरली. आग इतकी भीषण होती की, ती लवकरच जवळच्या इमारती, इतर
कोलकात्याच्या बारा बाजार मार्केटमध्ये भीषण आग


कोलकाता, १५ नोव्हेंबर (हिं.स.) कोलकात्याच्या बारा बाजार मार्केटमध्ये शनिवारी सकाळी भीषण आग लागली. एज्रा स्ट्रीटवरील एका इलेक्ट्रिक वस्तूंच्या दुकानात लागलेल्या आगीमुळे संपूर्ण परिसरात घबराट पसरली. आग इतकी भीषण होती की, ती लवकरच जवळच्या इमारती, इतर दुकाने आणि गोदामांमध्ये पसरली.

अग्निशमन विभागाच्या म्हणण्यानुसार, शनिवारी पहाटे ५ वाजण्याच्या सुमारास आगीची माहिती मिळाली. सुरुवातीला आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या सहा गाड्या आल्या. पण आगीची तीव्रता पाहता, नंतर ही संख्या २१ पर्यंत वाढवण्यात आली. घटनास्थळी अग्निशमन दलाचे जवान आगीवर नियंत्रण मिळविण्याचा सतत प्रयत्न करत आहेत, जरी दाट लोकवस्ती असलेला परिसर आणि ज्वलनशील पदार्थांच्या मुबलक प्रमाणात असल्याने आगीवर नियंत्रण मिळवणे अत्यंत कठीण होत आहे.

धुराच्या दाट ढगांनी संपूर्ण परिसर व्यापला आहे. सुरक्षिततेच्या उपाय म्हणून, आजूबाजूचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे. स्थानिक व्यवसायांचे म्हणणे आहे की, आगीमुळे मोठे आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे, कारण परिसरातील अनेक दुकाने पूर्णपणे जळून खाक झाली आहेत.कोलकाता पोलिसांचे डीसी सेंट्रल देखील घटनास्थळी पोहोचले आणि अग्निशमन अधिकाऱ्यांसह परिस्थितीचा आढावा घेतला.अग्निशमनदलाचे सुजित बोस यांनी प्राथमिक निष्कर्षांचा हवाला देत सांगितले की, आग शॉर्ट सर्किटमुळे लागली असावी. या प्रकरणी चौकशी सुरू आहे. कारण शोधण्यासाठी पोलीस आणि अग्निशमन विभागाची संयुक्त टीम तयार केली जाईल, असेही त्यांनी सांगितले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे


 rajesh pande