नाशिक जिल्ह्यातील तापमानात घट निफाडचा पारा 9 अंशावरती
नाशिक, 15 नोव्हेंबर (हिं.स.) जिल्ह्यामध्ये थंडी वाढू लागले असल्याने तापमान 10.3 अंश डिग्री सेल्सियस नोंदविण्यात आहे तर जिल्ह्यामध्ये निफाड चे तापमान सर्वात कमी नोंदविण्यात आले आहे. मागील काही दिवसांपासून नाशिक जिल्ह्यामध्ये थंडी वाढू लागली असून शन
नाशिक जिल्ह्यातील तापमानात घट निफाडचा पारा 9 अंशावरती


नाशिक, 15 नोव्हेंबर (हिं.स.) जिल्ह्यामध्ये थंडी वाढू लागले असल्याने तापमान 10.3 अंश डिग्री सेल्सियस नोंदविण्यात आहे तर जिल्ह्यामध्ये निफाड चे तापमान सर्वात कमी नोंदविण्यात आले आहे.

मागील काही दिवसांपासून नाशिक जिल्ह्यामध्ये थंडी वाढू लागली असून शनिवारी सकाळी किमान तापमान 10.3 डिग्री सेल्सिअस इतकं नोंदविण्यात आले आहे . शुक्रवारी हेच तापमान दहा पॉईंट नऊ अंश डिग्री सेल्सियस इतके नोंदविण्यात आले होते तर शनिवारी तापमानामध्ये घट झाली. जिल्ह्यातील निफाड येथे नऊ अंश डिग्री सेल्सिअस तापमान नोंदविण्यात आले आहे वेधशाळे कडून मिळालेल्या माहितीनुसार जिल्ह्यातील सिन्नर चांदवड आणि येवला या तीन तालुक्यांमध्ये निफाड नंतर कमी तापमान नोंदविण्यात आलेले आहे . वाढत्या थंडीमुळे द्राक्ष पिकांवर अजून परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे

जिल्ह्यामध्ये थंडीचे वातावरण निर्माण झाल्यानंतर आता शहरातील महात्मा नगर, हुतात्मा अनंत कान्हेरे मैदान, यासह विविध मैदान हे नागरिकांनी भरून गेले असून या ठिकाणी नागरिक थंडीचा आनंद घेण्याबरोबरच व्यायाम देखील करताना दिसून येत आहे

------------------------

---------------

हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV


 rajesh pande