
मुंबई, 16 नोव्हेंबर (हिं.स.)। मध्य रेल्वेच्या रेल्वे सुरक्षा दलावर रेल्वे मालमत्तेची, रेल्वे स्थानकांची आणि गाड्यांमधील आणि स्थानक परिसरात प्रवाशांची सुरक्षा करण्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
रेल्वेला गैरमार्गी घटकांपासून मुक्त ठेवण्यासाठी, आरपीएफने त्यांच्या गुप्तचर विभागाला मिळालेल्या माहितीच्या आधारे अनेक छापे टाकले आहेत.
ऑक्टोबर-२०२५ महिन्यात, मध्य रेल्वे आरपीएफने रेल्वे कायद्याच्या विविध कलमांखाली ८१८४ गुन्हेगारांना अटक करून त्यांच्यावर खटला चालवला आहे. दंड म्हणून गुन्हेगारांकडून ३८.०३ लाख रुपये वसूल करण्यात आले आहेत.
यामध्ये समाविष्ट आहे:
• महिलांसाठी राखीव असलेल्या डब्यातून प्रवास केल्याबद्दल रेल्वे कायद्याच्या कलम १६२ अंतर्गत २४३ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे आणि दंड म्हणून ६२,२००/- रुपये वसूल करण्यात आले आहेत.
• रेल्वे मालमत्तेची चोरी केल्याबद्दल रेल्वे मालमत्ता (बेकायदेशीर ताबा) कायद्याअंतर्गत ५९ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे आणि चोरीच्या वस्तूंसह दंड म्हणून ४.६२ लाख रुपये वसूल करण्यात आले आहेत.
• ८.२१ लाख रुपये किमतीची दारू, गांजा आणि तंबाखूजन्य पदार्थ बेकायदेशीरपणे बाळगल्याबद्दल १७ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
• प्रवाशांच्या सामानाची चोरी आणि प्रवाशांविरुद्धच्या इतर गुन्ह्यांसाठी १६१ जणांना अटक करण्यात आली आहे.
याशिवाय, रेल्वे आणि रेल्वे परिसरात प्रवाशांची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी आरपीएफने अनेक उपाययोजना केल्या आहेत-
• रेल्वे परिसरात आणि गाड्यांवरील हालचालींवर आरपीएफ त्यांच्या सीसीटीव्ही देखरेख प्रणालीद्वारे २४x७ लक्ष ठेवते.
• प्रवाशांची विशेषतः महिलांची सुरक्षा आणि संरक्षा सुनिश्चित करण्यासाठी आरपीएफ कर्मचाऱ्यांद्वारे वंदे भारत गाड्या, राजधानी एक्सप्रेस गाड्या, मेल आणि एक्सप्रेस गाड्या आणि उपनगरीय गाड्यांचे एस्कॉर्टिंग केले जाते.
गर्दीच्या वेळी उपनगरीय गाड्यांच्या पहिल्या आणि शेवटच्या डब्यात आरपीएफ कर्मचारी तैनात केले जातात. जेणेकरून चोरांवर लक्ष ठेवता येईल, जे सामान्यतः स्थानकांवरून ट्रेन निघाल्यावर हल्ला करतात.
• रात्रीच्या वेळी उपनगरीय गाड्यांच्या महिला डब्यांचे सुरक्षा कर्मचारी एस्कॉर्टिंग करतात.
• छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, लोकमान्य टिळक टर्मिनस, नाशिक रोड, पुणे, सोलापूर, अहिल्यानगर, दौंड, जळगाव, बडनेरा आणि नागपूर स्थानकांवर मेरी सहेली आरपीएफ पथके तैनात केली जातात जेणेकरून या स्थानकांवरून निघणाऱ्या/जाणाऱ्या गाड्यांचे निरीक्षण करता येईल.
• मुंबई विभागातील उपनगरीय गाड्यांसाठी ५४ “स्मार्ट सहेली” व्हाट्सॲप ग्रुप तयार करण्यात आले आहेत ज्यात २३,३३८ महिलांचा सक्रिय सहभाग आहे.
• ईएमयू रेक्सच्या सर्व ७८८ महिला कोचमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे प्रदान करण्यात आले आहेत.
• ईएमयू रेक्सच्या सर्व ७८८ महिला कोचमध्ये आपत्कालीन टॉक बॅक (ईटीबी) प्रणाली स्थापित करण्यात आली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर