तरुणांनी तंत्रज्ञानाचा सकारात्मक वापर करत नवनवीन कल्पना राबवाव्यात - जालना जिल्हाधिकारी
जालना, 16 नोव्हेंबर (हिं.स.)। “तरुणांनी तंत्रज्ञानाचा सकारात्मक वापर करत नवनवीन कल्पना राबवाव्यात. प्रशासन नेहमीच विद्यार्थ्यांच्या मागे उभे आहे.” असे जिल्हाधिकारी आशिमा मित्तल म्हणाल्या. यांनी आयसीटी महाविद्यालयाला भेट देत विद्यार्थ्यांशी थेट संवा
तरुणांनी तंत्रज्ञानाचा सकारात्मक वापर करत नवनवीन कल्पना राबवाव्यात - जालना जिल्हाधिकारी


जालना, 16 नोव्हेंबर (हिं.स.)। “तरुणांनी तंत्रज्ञानाचा सकारात्मक वापर करत नवनवीन कल्पना राबवाव्यात. प्रशासन नेहमीच विद्यार्थ्यांच्या मागे उभे आहे.” असे जिल्हाधिकारी आशिमा मित्तल म्हणाल्या. यांनी आयसीटी महाविद्यालयाला भेट देत विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधला. विद्यार्थ्यांना प्रशासनातील करिअर संधी, स्पर्धा परीक्षांची तयारी, ग्रामीण विकास, डिजिटल गव्हर्नन्स, पर्यावरण संरक्षण, जलसंधारण आणि महिला सुरक्षा यांसारख्या महत्त्वाच्या विषयांवर माहिती दिली.

आशिमा मित्तल यांनी महाविद्यालयातील शैक्षणिक उपक्रम, नवोपक्रम प्रकल्प आणि विद्यार्थ्यांच्या करिअरविषयक गरजा जाणून घेतल्या व जालना जिल्हाच्या विकासासाठी सहकार्य करण्याचे आवाहन केले.

त्यांनी विद्यार्थ्यांना सामाजिक जबाबदारीची जाणीव ठेवत समाजकार्यात सक्रिय सहभाग घेण्याचे आवाहन केले. जिल्हाधिकारी यांनी रसायन तंत्रज्ञान संस्थेतील अद्यावत व सुसज्ज प्रयोगशाळेची पाहणी केली. व येथील (XRD, S, ITC, Chemical Engg., Petro, Pharma, Food, Instrumentation lab ect.) उपलब्ध असलेल्या अद्यावत उपकरणांचा तसेच प्रयोगशाळेचा उपयोग करुन जालना जिल्ह्यातील पाणी व पेट्रोल अशा काही नाविन्यपुर्ण प्रकल्पाबांबत काम करावे असे सांगितले. जिल्हाधिकारी यांनी रसायन तंत्रज्ञान संस्थेतील अद्यावत संशोधन सुविधेची प्रशंसा केली.

---------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande