जालना शहराला स्वच्छ आणि सुंदर बनविण्यासाठी हातभार लावा - जिल्हाधिकारी
छत्रपती संभाजीनगर, 16 नोव्हेंबर (हिं.स.)। जालना शहर स्वच्छ ठेवण्यासाठी शहरवासीयांसाठी एक महत्त्वाची संधी उपलब्ध झाली आहे. श्रमदानाच्या माध्यमातून स्वच्छता अभियानात सहभागी होऊन आपल्या शहराला स्वच्छ आणि सुंदर बनविण्यास हातभार लावा. आपल्या सर्वांच्या
जालना शहराला स्वच्छ आणि सुंदर बनविण्यासाठी हातभार लावा - जिल्हाधिकारी


छत्रपती संभाजीनगर, 16 नोव्हेंबर (हिं.स.)। जालना शहर स्वच्छ ठेवण्यासाठी शहरवासीयांसाठी एक महत्त्वाची संधी उपलब्ध झाली आहे. श्रमदानाच्या माध्यमातून स्वच्छता अभियानात सहभागी होऊन आपल्या शहराला स्वच्छ आणि सुंदर बनविण्यास हातभार लावा. आपल्या सर्वांच्या सहभागाने जालना शहर एक आदर्श स्वच्छता असलेले शहर बनवूया, असे आवाहन महापालिका आयुक्त तथा जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी केले.

जालना महानगरपालिकेच्या वतीने जालना शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथून श्रमदानातून स्वच्छता करण्यात येणार आहे. या श्रमदानाचा आज प्रारंभ करण्यात आला. या श्रमदानाला नागरिक, विविध स्वयंसेवी संस्था, जालना फस्ट, रोटरी क्लब आणि महापालिका अधिकारी-कर्मचारी यांची उपस्थिती होती.

सर्व वयोगटातील लोकांना सहभागी होता येईल. आपल्यासोबत हातमोजे, मुखपट्टी, आणि पाण्याची बॉटल असावी. सहभागी व्हा, योगदान द्या आणि आपल्या शहराला एक आदर्श शहर बनविण्यासाठी आपण प्रयत्न करून जिल्हा प्रशासनाला सहकार्य करा, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

---------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande