महाआघाडीचे आमदार -खासदार करणार लोकसभा, विधानसभेतील मदतीची परतफेड
सोलापूर, 16 नोव्हेंबर (हिं.स.)। नगरपरिषद निवडणुकीचा रंग दिवसागणिक गडद होत आहे. भाजपच्या विरोधात लढायचंच, हे जवळपास सर्वांचेच ठरले आहे. पण लढताना झेंडा कोणता वापरायचा?, महाविकास आघाडीचा की स्थानिक आघाड्यांचा ? याबद्दल कमालीची गोपनीयता बाळगली जात आह
महाआघाडीचे आमदार -खासदार करणार लोकसभा, विधानसभेतील मदतीची परतफेड


सोलापूर, 16 नोव्हेंबर (हिं.स.)।

नगरपरिषद निवडणुकीचा रंग दिवसागणिक गडद होत आहे. भाजपच्या विरोधात लढायचंच, हे जवळपास सर्वांचेच ठरले आहे. पण लढताना झेंडा कोणता वापरायचा?, महाविकास आघाडीचा की स्थानिक आघाड्यांचा ? याबद्दल कमालीची गोपनीयता बाळगली जात आहे.जिल्ह्यात भाजप विरोधात लढताना बहुतांश ठिकाणी महाविकास आघाडीचा झेंडा मोडला जाणार हे स्पष्ट होऊ लागले आहे. नगरपरिषद व नगरपंचायतीसाठी उमेदवारी दाखल करण्यास सोमवारपर्यंतची मुदत आहे.भाजप विरोधात लढताना सोमवारी उमेदवारी अर्जासोबत कोणता उमेदवार कोणता ए व बी र्म जोडणार? यावरून संबंधित नगरपरिषदेतील चित्र स्पष्ट होणार आहे. बंडखोरी टाळण्यासाठी आणि सेकंड नंबरचे इलेक्टिव्ह मेरिट असलेला कार्यकर्ता विरोधकांच्या हाताला लागू नये यासाठी भाजप विशेष काळजी घेताना दिसत आहे. भाजपच्या उमेदवारीचे पत्ते शेवटच्या क्षणी ओपन होण्याची शक्यता आहे. भाजपच्या या खेळीमुळे त्या त्या तालुक्यातील विरोधकांचे राजकीय गणित बिघडताना दिसत आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande