'स्थास्वसं' निवडणुकीत सत्ताधारी भाजप आघाडीवर राहील - हेमंत पाटील
पुणे, 16 नोव्हेंबर (हिं.स.)। महिला शक्ती आणि युवाशक्तीने ठरवले तर सक्षम नेतृत्वाला सत्तारूढ करू शकतात. बिहारमध्ये देखील महिला तसेच नवमतदारांनी नरेंद्र मोदी आणि नीतीश कुमार यांच्या नेतृत्वात एनडीएला महाप्रचंड विजय मिळवून दिला. याच धर्तीवर राज्यात हो
Hemant Patil


पुणे, 16 नोव्हेंबर (हिं.स.)। महिला शक्ती आणि युवाशक्तीने ठरवले तर सक्षम नेतृत्वाला सत्तारूढ करू शकतात. बिहारमध्ये देखील महिला तसेच नवमतदारांनी नरेंद्र मोदी आणि नीतीश कुमार यांच्या नेतृत्वात एनडीएला महाप्रचंड विजय मिळवून दिला. याच धर्तीवर राज्यात होवू घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत सत्ताधारी भाजप प्रत्येक ठिकाणी आघाडीवर राहील, असे भाकीत इंडिया अगेन्स्ट करप्शनचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि ओबीसी नेते हेमंत पाटील यांनी शनिवारी (ता.१५) वर्तवले.

मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक ,ठाणे सह राज्यातील सर्व बड्या महानगर पालिकांसह जिल्हा परिषदांमध्ये भाजपच्या नेतृत्वात सरकार सत्तारूढ झाले तर, हे 'डबल इंजिन' स्थानिक पातळीवरील विकासकार्यालाही गती देवू शकेल.शेतकरी, महिला तसेच तरुणांच्या बाजूने भाजप सरकारने केलेले कार्य, त्यांची जमेची बाजू ठरेल. शिवाय शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यासाठी आणि त्यांच्या समस्यांवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी सरकारने पुढाकार घेत समिती स्थापन केली आहे. याचा फायदा प्रत्येक शेतकऱ्यांना होईल. या बळावर आगामी निवडणुकीत भाजप हा सर्वाधिक मोठा पक्ष ठरेल,असा विश्वास पाटील यांनी व्यक्त केला.

बिहारमध्ये मोदी आणि नितीश कुमार यांनी केलेल्या विकासकामांवर जनतेने विश्वास ठेवला.राज्यात देखील तीन पक्षाचे अर्थात भाजप, राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे सरकार आहे. या तिन्ही पक्षांने केलेल्या कार्याला जनता कौल देणार.देवेंद्र फडणवीस हे थेट जनतेच्या मनातील नेते असल्याने त्यांचा फायदा भाजपला होईल, असे भाकित पाटील यांनी व्यक्त केले.बिहारच्या विजयानंतर मात्र महाराष्ट्रातील भाजप कार्यकर्ता उत्साहाने आणि तेवढ्याच ताकदीने कामाला लागल्याचे चित्र दिसून येत असल्याचे पाटील म्हणाले.

---------------

हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर


 rajesh pande