
परभणी, 17 नोव्हेंबर (हिं.स.)।
पाथरी नगरपालिकेंतर्गत नगराध्यक्ष पदाकरिता प्रमुख राजकीय पक्षांच्या इच्छुकांसह एकूण 22 तर सदस्य पदाकरीता एकूण 201 उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत.
या नगरपालिकेत 10 नोव्हेंबर पासून उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरु झाली. 10 व 11 नोव्हेंबर रोजी एकही उमेदवारी अर्ज दाखल झाला नाही. 12 नोव्हेंबर रोजी अध्यक्ष व सदस्य पदासाठी प्रत्येकी 1, 13 नोव्हेंबर रोजी सदस्यपदासाठी 2, 14 नोव्हेंबर रोजी अध्यक्षपदासाठी 1 व सदस्य पदासाठी 19, 15 नोव्हेंबर रोजी अध्यक्ष पदासाठी 3 व सदस्य पदासाठी 39, रविवार 16 नोव्हेंबर रोजी अध्यक्ष पदासाठी 5 व सदस्य पदासाठी 72 तर आज सोमवार अंतीम दिवशी अध्यक्ष पदासाठी एकूण 12 जणांनी तर सदस्य पदासाठी 67 जणांनी असे एकूण आजपर्यंत नगराध्यक्ष पदासाठी 12 व सदस्यासाठी 201 उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. यामुळे राजकीय पक्षांसह निवडणूक विभागाचे अधिकारीसुध्दा गोंधळले आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis