सौदी अरेबियातील बस अपघात : पंतप्रधानांसह परराष्ट्री मंत्र्यांनी व्यक्त केलं दुःख
नवी दिल्ली , 17 नोव्हेंबर (हिं.स.)। सौदी अरेबियामध्ये झालेल्या एका भीषण रस्ते अपघातात 40 हून अधिक भारतीयांच्या मृत्यूची भीती व्यक्त केली जात असून अनेक जण हैदराबादचे रहिवासी असल्याचे सांगितले जात आहे. उमराहसाठी गेलेल्या यात्रेकरूंना घेऊन जाणारी बस
सौदी अरेबियातील बस अपघात: पंतप्रधानांसह परराष्ट्रीय मंत्र्यांनी व्यक्त केलं दुःख


नवी दिल्ली , 17 नोव्हेंबर (हिं.स.)। सौदी अरेबियामध्ये झालेल्या एका भीषण रस्ते अपघातात 40 हून अधिक भारतीयांच्या मृत्यूची भीती व्यक्त केली जात असून अनेक जण हैदराबादचे रहिवासी असल्याचे सांगितले जात आहे. उमराहसाठी गेलेल्या यात्रेकरूंना घेऊन जाणारी बस तेलाच्या टँकरला धडकल्याने हा अपघात घडला. दरम्यान या अपघाताबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर आणि केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी दुःख व्यक्त केले आहे.

पंतप्रधान मोदींनी सोशल मीडियावर शेअर केलेल्या एका पोस्टमध्ये लिहिले कि, “मदीना येथे भारतीय नागरिकांसोबत झालेल्या अपघाताची बातमी अत्यंत वेदनादायी आहे. पीडित कुटुंबीयांप्रति माझ्या संवेदना व्यक्त करतो. तसेच जखमींच्या लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना करतो. रियाधमधील भारतीय दूतावास आणि जेद्दाहमधील महावाणिज्य दूतावास सर्वतोपरी मदत पुरवत आहेत. आमचे अधिकारीही सौदी अरेबिया सरकारच्या अधिकाऱ्यांच्या संपर्कात आहेत.”

परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर यांनीही या अपघाताबद्दल दुःख व्यक्त केले. सोशल मीडिया पोस्टमध्ये त्यांनी सांगितले की रियाधमधील दूतावास आणि जेद्दाहमधील महावाणिज्य दूतावास अपघातग्रस्तांना मदत करत आहेत. परराष्ट्र मंत्र्यांनी मृतांना श्रद्धांजली वाहिली आणि जखमींच्या लवकर पूर्ण बरे होण्यासाठी प्रार्थना केली.

केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनीही दुःख व्यक्त करत सांगितले की ते दूतावासातील अधिकाऱ्यांच्या संपर्कात आहेत आणि पीडितांविषयी माहिती गोळा केली जात आहे तसेच सर्वतोपरी मदत करण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यांनी पीडित परिवारांप्रति संवेदना व्यक्त केल्या आणि काही हेल्पलाइन क्रमांकही जाहीर केले, ज्यावरून पीडितांविषयी माहिती मिळू शकते. क्रमांक : 8002440003 (टोल फ्री), 0122614093, 0126614276, 0556122301 (व्हॉट्सअ‍ॅप नंबर)

दरम्यान, जेद्दाहमधील भारतीय महावाणिज्य दूतावासाने सोशल मीडियावर सांगितले की सौदी अरेबियातील मदीना येथे झालेल्या या भीषण अपघातात पीडित भारतीय उमराह यात्रेकरूंसाठी 24x7 चालणारे एक नियंत्रण कक्ष (कंट्रोल रूम) तयार करण्यात आले आहे. त्याचा टोल फ्री नंबर 8002440003 असा आहे.

अहवालांनुसार, उमराह यात्रेकरूंना घेऊन जाणारी बस मक्का ते मदीना जात होती. यावेळी बसची वाटेत तिचा डिझेल टँकरशी धडक होऊन अपघात झाला. हा अपघात स्थानिक वेळेनुसार पहाटे सुमारे 1.30 वाजता मुहरास किंवा मुफरिआत या भागात झाला, जो मदीना शहरापासून सुमारे 160 किलोमीटर दूर आहे. अपघाताच्या वेळी अनेक प्रवासी झोपेत होते. धडक लागताच बसला तत्काळ आग लागली आणि लोकांना सुटण्यासही वेळ मिळाला नाही. अपघात इतका भयानक होता की मृतांची ओळख पटवणेही अत्यंत कठीण झाले आहे. या अपघातात किमान 42 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे, ज्यांमध्ये हैदराबादमधील अनेक यात्रेकरू असण्याची शक्यता आहे. मृतांमध्ये महिला आणि मुलांचाही समावेश आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande