
चंद्रपूर, 17 नोव्हेंबर (हिं.स.)।विधीमंडळ पक्षनेते आ.विजय वडेट्टीवार यांच्या प्रयत्नांनी सिंदेवाही तालुक्यात विविध विकास कामांचे भूमिपूजन व लोकार्पण नुकतेच पार पडले.
काॅंग्रेस विधीमंडळ पक्षनेते तथा ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्राचे आमदार विजय वडेट्टीवार यांच्या ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्रात कोट्यावधींच्या विकास कामांना मंजुरी मिळाली आहेत. आमदार विजय वडेट्टीवार यांनी आपल्या विकास कामांचा झंझावात कायम राखत सिंदेवाही तालुक्यात विविध विकासकामे मंजूर करवून घेतली आहेत. या विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण सोहळा नुकताच पार पडला आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / एम.पंकजराव