
सोलापूर, 17 नोव्हेंबर (हिं.स.)। पंढरपूर नगरपालिका निवडणुकीमधून काॅंग्रेसने अखेर माघार घेतली आहे. काॅंग्रेसच्या खासदार प्रणिती शिंदे यांनी आज तसे जाहीर केले. दरम्यान तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार प्रणिता भालके यांना पाठिंबा दिल्याचे त्यांनी पत्रकार परिषदेत जाहीर केले.खासदार प्रणिती शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये अहिल्यादेवी होळकर वाड्यामध्ये काॅंग्रेसपदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक झाली. याबैठकीमध्ये खासदार शिंदे यांनी पंढरपूरची निवडणूक काॅंग्रेस लढणार नसून तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या उमेदवार प्रणिता भालके यांना पाठिंबा दिल्याचे सांगितले. ऐनवेळी काॅंग्रेने निवडणूकीतून माघार घेतल्याने निष्ठावंत कार्यकर्त्यांमधून खासदार शिंदे यांच्या भूमिके विषयी नाराजी व्यक्त केली जात आहे.लोकसभेला खासदार प्रणिती शिंदे आणि विधानसभेला भगीरथ भालके यांना पंढरपूर विधानसभा मतदार संघातून चांगली मते मिळाली होती. काँग्रेसच्या चिन्हाचा त्यावेळी उमेदवाराला चांगला फायदा झाला होता. सध्या भाजप विरोधी लाट असताना ही काॅंग्रेसने निवडणूकीतून माघार घेतल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड