पुणे : भाजपची नगराध्यक्ष, नगरसेवक पदांची यादी अद्याप गुलदस्त्यातच
पुणे, 17 नोव्हेंबर (हिं.स.) : बारामती नगरपरिषद निवडणुकीचे नगराध्यक्ष आणि नगरसेवक पदांसाठी उमेदवारी अर्ज दाखल होण्यास सुरुवात झाली आहे. मात्र सलग सहाव्या दिवशी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस गटांसह महायुतीचा प्रमुख घटकपक्ष असणाऱ्या भाजपने नगराध्यक्ष आण
bjp


पुणे, 17 नोव्हेंबर (हिं.स.) : बारामती नगरपरिषद निवडणुकीचे नगराध्यक्ष आणि नगरसेवक पदांसाठी उमेदवारी अर्ज दाखल होण्यास सुरुवात झाली आहे. मात्र सलग सहाव्या दिवशी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस गटांसह महायुतीचा प्रमुख घटकपक्ष असणाऱ्या भाजपने नगराध्यक्ष आणि नगरसेवक पदांची यादी अद्यापपर्यंत गुलदस्त्यातच ठेवली आहे. त्यामुळे इच्छुकांचे जीव टांगणीला लागले आहेत. प्रमुख पक्षांनी उमेदवारी जाहीर करताना सावध भूमिका घेतल्याचे चित्र आहे. बारामती नगरपरिषद निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याच्या सहाव्या दिवशी नगराध्यक्षपदासाठी एकही अर्ज दाखल झालेला नाही. तर नगरसेवक पदासाठी केवळ १७ अर्ज दाखल करण्यात आले आहेत. नगराध्यक्षपदासाठी बहुजन समाज पार्टीचे महाराष्ट्र राज्य महासचिव काळुराम चौधरी यांनी अर्ज दाखल केला. गुरुवारी नगराध्यक्षपदासाठी आणि नगरसेवक पदासाठी एक अर्ज दाखल झाला आहे. आजअखेर नगराध्यक्ष पदासाठी एकूण ३ जणांनी अर्ज दाखल केले आहेत. तसेच नगरसेवक पदासाठी २४ जणांनी अर्ज दाखल केले आहेत. यामध्ये राष्ट्रीय समाज पक्ष, इंडियन नॅशनल काँग्रेस, वंचित बहुजन आघाडी तसेच अपक्षांचा समावेश आहे.-----------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande